माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय, अमित ठाकरेंचा दारूण पराभव

Assembly Election Result 2024 Amit Thackerays Vs Sada Saravankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यानुसार मुंबईत महायुती (Assembly Election Result 2024) आघाडीवर आहे, तर माहीममध्ये उद्धव ठाकरे यांचे शिलेदार महेश सावंत यांचा विजय झालेला आहे. तर राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव झालेला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार महेश बळीराम सावंत यांना 37, 459 मतं मिळालेली आहेत. तर सदा सरवणकर यांना 36, 208 इतकी मतं मिळालेली आहेत. अमित ठाकरेंना 25,168 मतांसह पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.
कोकणात महायुती की महाविकास आघाडी? विधानसभा निवडणुकीचा निकाल घ्या जाणून
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार आहे. राज्यात महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार,हे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 20 नोव्हेंबर रोजी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांपैकी 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात मतदानाची टक्केावारी 66.05 आहे.
Assembly Election Result : उत्तर महाराष्ट्रात कोणाची बाजी? भुजबळ, विखे, अन् जगतापांची आघाडी…