Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकरावर घणाघाती टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आता झारखंड राज्यात पोहोचली आहे.
राहुल गांधी म्हणाले, चंपाई सोरेन यांनी भाजप-आरएसएसचे षडयंत्र थांबवले आणि सरकार स्थापन केले. देशात आघाडीचे सरकार आल्यास आम्ही सर्वात आधी जाती आधारित जनगणना करू. सध्याच्या तरतुदींनुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. परंतु, देशात जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर सरकार आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकील. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणात कोणतीही कपात केली जाणार नाही. समाजातल्या मागासलेल्या घटकांना त्यांचे हक्क मिळतील याची मी खात्री देतो. सामाजिक आर्थिक अन्याय हा आजघडीला सर्वात मोठा मुद्दा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
संसदेत घुसखोरीवेळी भाजप खासदार पळून गेले; गौप्यस्फोट करत Rahul Gandhi मीडियावर भडकले
पंतप्रधान मोदी म्हणतात की ते स्वतः ओबीसी आहेत. पण ज्यावेळी जात आधारित जनगणनेची मागणी केली जाते त्यावेळी त्यांनी सांगितलं की येथे फक्त गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती आहेत. जेव्हा ओबीसी, दलित, आदिवासींना अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा मोदीजी म्हणतात की कोणतीही जात नाही आणि जेव्हा मते घेण्याची वेळ येते तेव्हा म्हणतात की ते ओबीसी आहेत.
चंपाई सोरेन (Champai Soren) यांच्या नेतृत्वातील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. परंतु भाजपने सरकार पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कारण राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे हे भाजपा मान्य करू शकत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) त्यांच्याविरोधात उभे राहिले आणि सरकार वाचले. तपास यंत्रणा आणि पैशांच्या जोरावर विरोधकांच्या राज्यात अशा प्रकारच्या कारवाया त्यांच्याकडून सुरू असतात.
‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं