Download App

हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन होणार मुख्यमंत्री? भाजपच्या खासदारच्या दाव्याने खळबळ

Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या पुढील मुख्यमंत्री असतील, असा दावा त्यांनी सोशल मीडिया साइट X वर केला आहे.

निशिकांत दुबे यांनी पोस्ट केले, झारखंडमधील गांडेय येथील आमदार सरफराज अहमद यांनी विधानसभेचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. झारखंडच्या पुढील मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) असतील. नवीन वर्ष सोरेन कुटुंब वेदनादायक असणार आहे.

Goldy Brar : गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

एनडीए कोणत्याही परिस्थितीत गांडेयची जागा जिंकेल
निशिकांत दुबे यांनी आणखी दोन पोस्ट्स केल्या, राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घ्यावा, झारखंड विधानसभेची स्थापना 27 डिसेंबर 2019 रोजी झाली. सरफराज अहमद यांचा राजीनामा 31 डिसेंबर रोजी झाला. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत निवडणुका होऊ शकत नाहीत. हा पक्ष हेमंत सोरेनचा नसून शिबू सोरेनचा आहे. सीता सोरेन आणि बसंत सोरेन हे आमदार आहेत. चंपाई, मथुरा, सायमन आणि लोबिन, नलिन यांनी मोठ्या कष्टाने तयार केलेल्या पक्षाची अवस्था इतकी वाईट आहे का? कोणत्याही परिस्थितीत गांडेयची जागा एनडीए जिंकणारच.

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

निशिकांत दुबे यांनी तिसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गांडेय येथे निवडणूक होऊ शकत नाही. महाराष्ट्रात जेव्हा काटोल विधानसभा रिक्त झाली तेव्हा विधानसभेचा कार्यकाळ 1 वर्ष 50 दिवसांचा होता. राज्यपाल महोदय, कल्पना सोरेन जर कोठूनही आमदार होऊ शकल्या नाहीत तर त्या मुख्यमंत्री कशा होतील? झारखंडला कुरण बनवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

दरम्यान, सीएम सोरेन यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी ईडीने सीएम सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी सातवे समन्स जारी केले होते. ईडीने आपल्या समन्समध्ये म्हटले होते की, वारंवार समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांना हजर राहण्याची शेवटची संधी दिली जात आहे. ईडीने त्यांना हजर राहण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे.

follow us