Jio Platforms IPO चा विक्रम; एक कोटींहून अधिक अर्ज; भारताच्या शेअर बाजारात नवा इतिहास !

Jio Platforms IPO: शेवटच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हा आयपीओ 11.58 पट सबस्क्राइब झाला आहे.

Jio Ipo

Jio Ipo

Jio Platforms IPO : रिलायन्स समूहातील (Reliance Industries) जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओने (Jio Platforms IPO) जागतिक स्तरावर नवा विक्रम रचला आहे. या आयपीओसाठी एक कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज मिळवणारा हा जगातील पहिला आयपीओ ठरल्याचा दावा करण्यात आलाय. 30,213 कोटी रुपयांच्या या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळालाय. शेवटच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हा आयपीओ 11.58 पट सबस्क्राइब झाला आहे.


जंतर मंतर आंदोलनानंतर नेत्यांना पुन्हा नोटीस, दिल्ली पोलिसांच्या पुढील हालचालींकडं लक्ष

जिओच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओने अर्जांच्या संख्येच्या बाबतीत यापूर्वीचे विक्रम मोडले आहेत. यापूर्वी वारी एनर्जीजच्या (Waaree Energies Ltd )आयपीओला सुमारे 97 लाख अर्ज मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच बजाज हाउसिंग फायनान्स आणि बीसीसीएलच्या (भारत कोकिंग कोल लिमिटेडचा) आयपीओंनाही मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी 1 कोटींहून अधिक अर्ज आल्याने हा विक्रम चर्चेत आला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आकडेवारीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:36 वाजेपर्यंत या आयपीओसाठी उपलब्ध 19.75 कोटी शेअर्सच्या तुलनेत 147.98 कोटी शेअर्ससाठी बोली लागली आहे. त्यामुळे आयपीओ एकूण 7.49 पट सबस्क्राइब झाला होता. तर दुपारी तीनपर्यंत हा आयपीओ 11.58 पट सबक्राइब झाला आहे.


महिलांना पाहताच पक्षी लवकर उडून जातात; पुरुषांना मात्र जवळ येऊ देतात, असं का? वैज्ञानिकही चक्रावले…

संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला विविध गुंतवणूकदार गटांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB): 16.06 पट सबस्क्रिप्शन केले आहे. तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII): 10.14 पट सबस्क्रिप्शन केले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदार (RII): 2.10 पट सबस्क्रिप्शन झाले आहे. या आकडेवारीवरून संस्थात्मक आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये विशेष रस दाखवल्याचे स्पष्ट होते.


भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार ?

जिओ प्लॅटफॉर्म्सचा 30,213 कोटी रुपयांचा आयपीओ पूर्ण झाल्यानंतर इश्यूच्या आकाराच्या बाबतीत तो भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. यामुळे Hyundai Motor India चा 27,859 कोटी रुपयांचा आयपीओ मागे पडू शकतो. या आयपीओमध्ये 27 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे या इश्यूमध्ये विद्यमान भागधारकांकडून शेअर्स विक्रीचा (Offer for Sale) समावेश नाही.

एकनाथ शिंदेंविरोधात नेमकं काय शिजतंय?, भाजपकडं बोट करून कदमांचं खळबळजनक वक्तव्य

आयपीओची किंमत किती? एका लॉटसाठी किती पैसे ?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये असा किंमतपट्टा (Price Brand) निश्चित करण्यात आला आहे. या किंमतपट्टा कंपनीचे मूल्यांकन सुमारे 10.3 लाख कोटी रुपये होते. शेअरची अलॉटमेंट 26 ऑक्टोबरला होईल. तर 28 ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होणार आहे.

ग्रे मार्केटमध्येही आयपीओची चर्चा
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओबाबत अनधिकृत ग्रे मार्केटमध्येही सकारात्मक वातावरण असल्याचे वृत्त आहे. 22 ऑक्टोबर रोजी कंपनीचे असूचीबद्ध शेअर्स सुमारे 1,368 रुपयांवर व्यवहार करत असल्याचे सांगितले होते. आयपीओच्या 1,119 रुपये या उच्च किंमतपट्ट्याच्या तुलनेत हा दर सुमारे 249 रुपयांनी अधिक होता. म्हणजेच, ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) अंदाजे 22.25 टक्के होता. मात्र, ग्रे मार्केट हे अनधिकृत आणि अनियंत्रित असल्याने या प्रीमियमवरून शेअरची प्रत्यक्ष लिस्टिंग किंमत किंवा लिस्टिंगनंतरचा परतावा निश्चित होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ GMP च्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये.

जिओच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी का?
विविध ब्रोकरेज कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही ब्रोकरेज कंपन्यांनी लिस्टिंग गेन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने या आयपीओला सबस्क्राइब करण्याची शिफारस केलीय. Motilal Oswal Wealth Management ने जिओचे दूरसंचार क्षेत्रातील नेतृत्व, मोठा ग्राहकवर्ग, स्वतःचे तंत्रज्ञान आणि ब्रॉडबँड व्यवसायातील विस्तार या बाबींना महत्त्व दिले आहे. Swastika Investmart ने भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचा फायदा कंपनीला होऊ शकतो, असे नमूद करत सकारात्मक भूमिका घेतलीय. Canara Bank Securities नेही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आयपीओचा विचार करण्याची शिफारस केली आहे. 2G ग्राहकांचे 4G आणि 5G नेटवर्ककडे होणारे रुपांतर, घरगुती ब्रॉडबँडचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानाच्या परदेशातील व्यावसायिक संधी यामुळे कंपनीला भविष्यात फायदा होऊ शकतो, असे ब्रोकरेजचे मत आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्सचा व्यवसाय नेमका काय?
जिओ प्लॅटफॉर्म्स ही भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांच्या क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. कंपनीच्या व्यवसायामध्ये दूरसंचार नेटवर्क, उपकरणे, सॉफ्टवेअर आणि विविध डिजिटल अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. कंपनी ग्राहकांसाठी तसेच उद्योगांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सेवा विकसित करण्यावरही भर देत आहे. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 1.4 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वाढत्या डिजिटल बाजारपेठेत जिओ प्लॅटफॉर्म्सला विस्ताराच्या नव्या संधी मिळू शकतात.

Exit mobile version