Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. यामध्ये ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) या युट्यूबरचा समावेश आहे. तिला हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं. आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या वडिलांना अखेर सत्य उघड केलंय. माझी मुलगी युट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी पाकिस्तानात गेली असल्याचा दावा ज्योतीच्या वडिलांनी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी त्यांनी संवाद साधलायं.
सबक ऐसा सिखाऐंगे इनकी पीढीया याद रखेगी; भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ शेअर
पुढे बोलताना ते म्हणाले, माझी मुलगी व्हिडीओ शूट करण्यासाठी देशात आली होती, तसेच ती सीमेपलीकडील मित्रांशी संपर्क का करू शकत नाही?”, असं म्हणत ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी तिचा बचाव केला आहे. तसेच पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाचे फोन, बँक स्टेटमेंट, लॅपटॉप जप्त केल्याचा दावा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी आपले फोन परत देण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.
तसेच ज्योती मल्होत्रा यूट्यूब व्हिडीओ शूट करण्यासाठी पाकिस्तान आणि इतर ठिकाणी जायची. जर तिचे काही मित्र तिथे असतील तर ती त्यांना फोन करू शकत नाही का? माझी कोणतीही मागणी नाही, पण आमचे फोन आम्हाला द्या. आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असंही ते म्हणाले आहेत.
राज्याला वादळी पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; छत्री घेऊनच बाहेर पडा
ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिस तपासात तिची मैत्रीण प्रियंका सेनापती हिचं नाव समोर आलंय. त्यानंतर पोलिसांनी तिच्या ओडिसामधील घरी छापेमारी केली आहे. ओडिसा मधील पुरी येथे राहणारी प्रियंका सेनापती ही देखील एक युट्युबर आहे. ज्योती मल्होत्राशी असलेल्या तिच्या मैत्रीमुळे पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. प्रियांका आणि ज्योती यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान, 2023 मध्ये ज्योतीने कमिशनमार्फत पाकिस्तानचा व्हिसा मिळवला होता. त्यातून दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील एहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दानिशशी जवळची मैत्री झाली. या मैत्रीमुळे तिची दानिशने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्याशी ओळख करून दिली. ती पाकिस्तान हायकमिशनच्या कार्यालयात गेली. तेथे तिची अनेक पाक अधिकाऱ्यांशी भेट झाल्याचे समोर येत आहे. ज्योती या एजंट्ससोबत व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात राहायची. ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची, सोबतच तिने काही संवेदनशील माहितीसुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिली.