Download App

अरेच्चा हे काय भलतंच! महिला पंचांऐवजी त्यांच्या पतीराजांनीच घेतली शपथ; सचिव निलंबित

नवनिर्वाचित सहा महिला पंचांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांनाच पदाची शपथ दिली गेली. व्हिडिोओ व्हायरल होत आहे.

Chhattisgarh News : भाजपशासित छत्तीसगड राज्यातून एक हैराण करणारी घटना (Chhattisgarh News) समोर आली आहे. कबीरधाम येथील पंडरिया ब्लॉक स्थित परसवाडा पंचायतीत निष्काळजीपणाचा प्रकार घडला आहे. येथे नवनिर्वाचित सहा महिला पंचांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांनाच पदाची शपथ दिली गेली. इतकेच नाही तर या शपथग्रहण सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा पंचायत सीईओंनी तत्काळ पंचायत सचिवांना निलंबित करून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी पहिल्याच सभेत शपथ घेतली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, पंडरियातील परसवाडा ग्रामपंचायतीच्या 12 प्रभागांत 6 महिला आणि 6 पुरुष उमेदवार विजयी झाले होते. या सर्व लोकप्रतिनिधींना मंगळवारी शपथ दिली जाणार होती. पण पंचायतीच्या सचिवांनी यातील सहा महिला उमेदवारांऐवजी त्यांच्या पतीराजांनाच शपथ दिली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हा प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे.

छत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी 8 नक्षलवाद्यांना शोधून टिपलं; एक जवान शहीद

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेचे सीईओ अजय त्रिपाठी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पंचायत सचिवांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. याआधी ग्रामपंचयातीचे सचिव प्रदीप ठाकूर यांनी हा व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्ट करत 3 मार्च रोजी 6 पुरुष लोकप्रतिनिधींना शपथ दिल्याचे म्हटले होते. उर्वरित सहा महिला लोकप्रतिनिधींना 6 मार्च रोजी शपथ देण्यात आली. परंतु, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत पंचायत सचिवांची चूक असल्याचे स्पष्ट झाले.

पंडरिया विधानसभा मतदारसंघाच्या आमदार भावना वोहरा आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली. प्रशासनाच्या या कारभारावर खोचक टीकाही सुरू झाली. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीनंतर दोषी आढळलेल्या व्यक्तींवर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर, उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव

follow us