छत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी 8 नक्षलवाद्यांना शोधून टिपलं; एक जवान शहीद

  • Written By: Published:
छत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी 8 नक्षलवाद्यांना शोधून टिपलं; एक जवान शहीद

8 Maoists, one security personnel killed in encounter in Abujhmarh : छत्तीसगडच्या अबुझमर्हमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबुझमर्हच्या जंगलात झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला आहे तर, दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

अबुझमर्ह हे नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात मोडणारे डोंगराळ जंगल आहे. भौगोलिकदृष्ट्या हा भाग मोठ्या प्रमाणात दुर्गम असून, हा परिसर नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. नुकतीच या भागात कारवाई करण्यात आली होती. यात सुरक्षा दलाच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नानी पोहचवण्यात आले होते. विजापूरच्या सीमेला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत हे नक्षलवादी ठार झाले होते.

वर्षभरात 112 नक्षलवाद्यांना कंठस्नान

गेल्या वर्षभरापासून छत्तीसगडमधील बस्तर भागात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने अनेक कारवाया केल्या आहेत. गेल्या वर्षात 112 नक्षलवाद्यांच्या मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच 10 मे रोजी विजापूरच्या एका गावात चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले होते. तर 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले होते.तर 16 एप्रिल रोजी कांकेरमध्ये 29 जण ठार झाले. परंतु सुरक्षा दलावर काही आरोप झाले आहेत. विजापूरमध्ये मारलेले गेले निर्दोष गावकरी होते, असा आरोप ग्रामस्थ आणि अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज