Download App

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन निवडणुकीच्या रिंगणात, जेएमएमकडून उमेदवारी जाहीर

कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने कल्पना यांना उमेदवारी दिली.

  • Written By: Last Updated:

Kalpana Soren will contest the Assembly Election : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहत आहेत. अनेक पक्षांनी दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने (Jharkhand Mukti Morcha) कल्पना यांना गांडेय विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. गांडेय विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

मी वाघासारखं जगलो, तुझी शिकार तर नक्की करणार; संजय गायकवाडांचा तुपकरांना इशारा 

झारखंड मुक्ती मोर्चाने आज गुरुवारी सांगितले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि गांडेय विधानसभा पोटनिवडणूक 2024 मधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. पक्षाने समीर मोहंती जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून, तर कल्पना सोरेन यांना गांडेय विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Lok Sabha Election : पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांकडे कोट्यवधींची संपत्ती, कर्जाचा आकडाही मोठा 

दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कल्पना सोरेन या गांडेय विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करत होत्या. हा मतदारसंग झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात आहे. या मतदारसंघात त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले. पक्षाचा मेळावाही घेतला होता.

हेमंत सोरेन यांना अटक होण्यापूर्वीच कल्पना सोरेन यांच्या नावा झारखंडच्या राजकारणाच चर्चा होता. ईडीने सोरेन यांना अटक केल्यानंतर कल्पना सोरेन आता राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, तसे होऊ शकल नाही आणि चंपाई सोरेन यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. दमम्यान, आता कल्पना सोरेना विधानसभेची पोटनिवडणूक लढणार आहेत.

कोण आहे कल्पना सोरेन?

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्या मूळच्या ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म 1976 मध्ये रांचीमध्ये झाला होता. त्यांचे वडील व्यापारी तर आई गृहिणी आहेच. कल्पना यांचे प्रारंभिक शिक्षण बारीपाडा येथील केंद्रीय विद्यालयातून झाले. यानंतर त्यांनी भुवनेश्वरमधील महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण घेतले. पुढं त्यांनी एमबीएचे शिक्षणही पूर्ण केलं. 7 फेब्रुवारी 2006 रोजी कल्पना यांनी हेमंत सोरेन यांच्याशी लग्न केलं.

follow us