Download App

झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण?

Kalpana Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कुठल्याही क्षणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी सोरेने यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सोमवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानावर छाप्या टाकणार आला होता. हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याने झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झारखंडमध्येही बिहारचीच पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता आहे. कारण हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर ते पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सोपवणार असल्याचंही बोललं जात आहे. संपूर्ण घडामोडींवर राजकीय विश्लेषकांकडून अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता कल्पना सोरेन नेमक्या आहेत तरी कोण? त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Manoj Jarange : तो टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील डाग; आंतरवालीतील लाठीचार्जवर जरांगे संतापले

कल्पना सोरेन यांचा जन्म 1976 मध्ये झारखंडमधील रांची येथे झाला. त्याचे वडील व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे. कल्पना सोरेन यांनी इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले असून पुढे त्यांनी एमबीए केले आहे. कल्पना ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील असून 7 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांचा विवाह हेमंत सोरेन यांच्याशी झाला. कल्पना आणि हेमंत सोरेन यांना दोन मुले आहेत. निखिल सोरेन आणि अंश सोरेन अशी त्यांची नावे आहेत.

परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!

कल्पना सोरेन सध्या काय करतात?
कल्पना सोरेन स्वतः व्यवसाय आणि धार्मिक कार्याशी निगडीत आहेत. कल्पना शिक्षणसंस्थाही चालवत असून सेंद्रिय शेतीच्या कामातही त्यांचा सहभाग आहे. एकूण तीन व्यवसायिक कंपन्या त्यांच्या मालकीच्या असून त्या महिला आणि बाल विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी जोडलेल्या आहेत.

राजकीय पार्श्वभूमी :
कल्पना सोरेन यांना पूर्वीची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे कुटुंब ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या पत्नीच्या व्यवसायासाठी चुकीच्या पद्धतीने भूखंड खरेदी केल्याचा आरोप झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी केला होता. त्यानंतर कल्पना सोरेन प्रकाशझोतात आल्या होत्या.
हेमंत सोरेन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आदिवासींसाठी तयार केलेल्या भूखंडाचा भाग असलेल्या जमिनी मिळवल्याचा आरोप होता.

बिहारची पुनरावृत्ती…
बिहारमध्येही लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना ते अडचणीत सापडले होते. तेव्हा लालू प्रसाद यादव यांनीही आपली पत्नी राबडी देवी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे दिली होती. त्यामुळे आता हेमंत सोरेनदेखील ईडीच्या सत्रात सापडल्याने ते मुख्यमंत्रिपदाची सुत्रे पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडेच देतील, असा अंदाज भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी लावला आहे.

दरम्यान, आधीच्या काळातही जेएमएमचे आमदार सरफराज अहमद यांनी हेमंत सोरेन तुरुंगात जाण्याच्या भीतीने मतदारसंघाची जागा सोडली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन यांनी आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ही जागा सोडली असल्याचं बोललं जात होतं. कारण या जागेवरुन पत्नी कल्पना सोरेन यांना सहा महिन्यात मुख्यमंत्री करता आलं असतं.

follow us