Download App

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक, पाच जणांचा मृत्यू

जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.

  • Written By: Last Updated:

West Bengal Train Accident : पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. (Train)  जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी आहेत. (Train Accident) त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (West Bengal) दरम्यान, यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेक्यू टीम दाखल झाली असून, बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

२० ते २५ जण जखमी मध्य प्रदेशात ११ घरांवर बुलडोझर कारवाई; फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याचा आरोप, एकाला अटक

अगरतलावरून ही मालगाडी सियालदाह येथे जात होती. दरम्यान, या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी जोरदार बसल्याने कंचनजंगा एक्सप्रेसचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली.

रेल्वेमंत्र्यांची प्रतिक्रिया

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातानंतर प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत. याबरोबरच या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. तसंच, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

follow us