Download App

हायप्रोफाईल तस्करीचा पर्दाफाश! 14.8 किलो सोन्यासह अभिनेत्री गजाआड; कुठे घडली घटना?

बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली आहे.

Ranya Rao Arrested : सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल रॅकेट उघड झाले आहे. डीआरआयने मोठी कारवाई करत बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री रावकडून तब्बल 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. यानंतर या अभिनेत्रीचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. सोमवारी सायंकाळीच अभिनेत्रीला आर्थिक अपराध न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने रान्या रावला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रान्या राव एमिरेट्सच्या विमानाने दुबईतून बंगळुरूत आली होती. तिच्या वारंवार होणाऱ्या विमान प्रवासावर निदेशालयाची नजर होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की रान्या रावने तिच्या कपड्यांत सोने लपवून आणले होते. अभिमेत्रीला डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने अटक करताच राज्यात खळबळ उडाली आहे.

जगातील ‘या’ 10 देशांकडे सोनेच सोने; भारताकडे किती सोनं? वाचा, यादी..

अभिनेत्री गोल्ड स्मग्लिंग टोळीची सदस्य?

डीआरय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रान्या दुबईवरुन बंगळुरूत आली होती. तिच्या शरीरावरील पट्ट्यात 14 किलो सोने लपवलेले होते. याबरोबरच 800 ग्रॅम सोन्याचे दागिनेही तिच्याकडे मिळाले. यानंतर मंगळवारी सायंकाळी तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रान्या राव एखाद्या सोने तस्करी करणाऱ्या टोळीची सदस्य असावी असा संशय अधिकाऱ्यांना आहे. ही टोळी मागील काही महिन्यांपासून बंगळुरू विमानतळाच्या माध्यमातून सोने तस्करीचे उद्योग करत आहे.

रान्या राव कोण

रान्या रावने काही कन्नड चित्रपटांत काम केले आहे. यामध्ये सुदीप स्टार मानिक्य आणि गणेश स्टार पटाकी असे काही चित्रपट आहेत. विक्रम प्रभू स्टार तामिळ चित्रपट वगाहमध्येही रान्या रावने भूमिका साकारली आहे. चित्रपटात काम करत असताना रान्या राव अचानक सोने तस्करीकडे कशी वळली याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जाईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रान्या सातत्याने परदेशात प्रवास करत होती. त्यामुळे डीआरआयला तिच्यावर संशय आला. या वर्षाच्या सुरुवातीपासून तिने जवळपास 10 वेळा विदेशात प्रवास केला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी नंतर रान्या रावच्या खाडी देशांतील प्रवासावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. सोमवारी ज्यावेळी रान्या दुबईतून बंगळुरूला येणाऱ्या विमानात बसली त्यावेळी डीआरआयच्या एका पथकाला पाठवण्यात आले. विमानात उतरताच ती नेहमीसारखीच वावरत होती. त्यामुळे कुणालाही तिच्यावर संशय आला नाही.

इडली आवडीने खाताय? पण होऊ शकतो कॅन्सर; कर्नाटकात इडली फेल, काय घडलं?

follow us