जगातील ‘या’ 10 देशांकडे सोनेच सोने; भारताकडे किती सोनं? वाचा, यादी..

Top 10 Countries with Highest Gold Reserve : सोने फक्त दगिनाच म्हणून नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे (Gold Reserve) मजबूत प्रतीक म्हणून ओळखले जाते. यासाठीच जगातील बहुतांश देश सोन्याचा साठा अधिकाधिक वाढवण्यावर भर देत असतात. जागतिक पातळीवर सोने साठा देशाच्या आर्थिक परिस्थितीचा संकेत असतो. चला तर मग यानिमित्ताने जगातील सर्वाधिक सोने साठा असणाऱ्या दहा देशांची माहिती घेऊ या..
अमेरिका
आजमितीस अमेरिकेकडे जगात सर्वाधिक सोने साठा आहे. सध्या अमेरिकेकडे 8133.46 टन सोने साठा आहे. एकूण जागतिक सोने साठ्याचा हा 25 टक्के हिस्सा आहे. अमेरिकी सोने प्रामुख्याने फोर्ट नोक्स, वेस्ट पॉइंट आणि डेनवर मिंट मध्ये स्टोअर केले आहे. अमेरिकी डॉलरच्या वाढत्या ताकदीमागे विशाल सोने साठा हे देखील एक कारण आहे.
जर्मनी
सोने साठ्याचा बाबतीत जर्मनीचा दुसरा नंबर आहे. या देशाकडे सध्या 3351.53 टन सोने साठा आहे. युरोप खंडात जर्मनी कडेच सर्वाधिक सोने आहे. जर्मनीचा बहुतांश सोने साठा बुंडेस बँक द्वारे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यातील एक मोठा हिस्सा न्यूयॉर्क आणि लंडन मध्येही संग्रहित आहे.
इटली
युरोपातील इटली हा देश सोने साठ्याचा बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाकडे सध्या 2451.84 टन सोने आहे. इटलीच्या अर्थव्यवस्थेत मध्यंतरी काही समस्या निर्माण झाल्या होत्या. तरीही देशाने सोने साठा कायम राखला. देशाची बहुतांश संपत्ती बँक ऑफ इटली मध्ये जमा आहे.
फ्रान्स
फ्रान्सकडे आजमितीस 2436.94 टन सोने आहे. सोने साठ्याचा बाबतीत हा देश जगात चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रांसने त्याच्याकडील सोने साठा अनेक वर्षांपासून सुरक्षित ठेवला आहे. बँक ऑफ फ्रान्स मध्ये संग्रहित करण्यात आलेले सोने देशाच्या स्थिरतेसाठी अतिशय महत्वाचे आहे.
‘या’ 5 कारणांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! ‘अशी’ घ्या काळजी…
रशिया
सोने साठ्याचा बाबतीत रशिया जगात पाचव्या क्रमांकाचा देश आहे. रशियाकडे सध्या 2335.5 टन सोने आहे. काही वर्षांत रशियाने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे. विदेशी संपत्तीत डॉलरवरील अवलंबित्व कमी करून सोन्यात हिस्सेदारी वाढविण्यावर रशिया काम करत आहे. बहुतांश सोने रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी आहे.
चीन
चीनकडे सध्या 2191.53 टन सोने आहे. चीनचा सोने साठा सातत्याने वाढत आहे. चीन जगातील एक मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी देखील सोने साठ्याचा बाबतीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे. चीन सोन्याचा मोठा उत्पादक देश आहे. मात्र चीन अनेक उत्पादनांना घरेलु भांडाराशी जोडले आहे.
स्वित्झर्लंड
युरोपातील छोटा देश स्वित्झर्लंड 1040 टन सोन्यासह सातव्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड बँक आणि आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत जगात प्रसिद्ध आहे. देशाचा सोने साठा स्वीस नॅशनल बँकेकडून नियंत्रित केला जातो.
भारत
भारताकडे आजमितीस 853.78 टन सोने साठा आहे. भारत जगात सर्वाधिक सोने वापर असलेला देशांच्या यादीत आहे. भारतीय रिजर्व बँक सोने साठ्याचे व्यवस्थापन करते. या व्यतिरिक्त भारतीय नागरिक आणि मंदिरांमध्ये प्रचंड सोने आहे. हे सोने किती आहे याचा अंदाज घेता येणे शक्य नाही.
आणखी एक आनंदवार्ता! आम आदमी सुखावला; महागाई 5 महिन्यांत सर्वात कमी..
जपान
जपानकडे आजमितीस 845.97 टन सोने आहे. देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी जपानने सोन्याचा साठा वाढवला आहे. जपानचे सोने बँक ऑफ जपानकडे ठेवले आह.
नेदरलँड्सकडे सध्या 612.45 टन सोने साठा आहे. सोने साठ्याच्या यादीत हा देश दहाव्या क्रमांकावर आहे. न्यू्यॉर्क येथे असलेले सोने पुन्हा देशात आणण्यात आले आहे. डच सेंट्रल बँकेकडून या सोन्याचे नियंत्रण केले जाते.
ट्रेडिंग इकॉनॉमिक्स नुसार 2024 च्या चौथ्या तिमाहीत पाकिस्तानचा एकूण सोने साठा 64.74 टन इतका होता. या नुसार सोने साठ्याच्या बाबतीत पाकिस्तान 46 व्या क्रमांकावर आहे.