गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले.
अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी एक भावनिक वाक्य बोलत संपवला. ते म्हणाले की, “मी ही केस जिंकेन किंवा हरेन..त्यासाठी मी इथे उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल”
Sibal: I stand here not for this case.
I stand here for the protection of what is so close to our heart- institutional integrity and to ensure that constitutional processes survive. If your lordships uphold this, it would be the death of what we've upheld since 1950s.#ShivSena— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2023
कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी कोर्टात युक्तिवाद करत आहेत. सिंघवी यांच्यानंतर ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करतील. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील.
हेही वाचा : Thackeray Vs Shinde : तिसऱ्या दिवशीही कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद
दरम्यान सुनावणीच्या तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करतील. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद होईल.
पुढच्या आठवड्यात शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद लवकर संपवला तर त्यानंतर निर्णय होईल. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल असं वाटतं, असं मत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे.