FIR Against HomeMinister Amit Shah : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच उडाली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची टीम उतरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. पण अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घटना घडली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काँग्रेसकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यात दंगली होतील, असे विधान अमित शाहा यांनी केले होते. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत अमित शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासोबतच काँग्रेसने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
काँग्रेस नेते आणि कर्नाटक निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी गुरुवारी बेंगळुरू येथील हाय ग्राऊंड पोलीस स्टेशनमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या विरोधात तसेच रॅलीच्या आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भडकाऊ भाषण करणे, लोकांमध्ये तेढ पसरवणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
Home Minister, Sh. Amit Shah is obligated to uphold the law.
Sadly, he himself is violating the law committing serious offences under the IPC & Representation of People’s Act by making false & misleading statements against the Congress and creating division and enmity.
This… pic.twitter.com/1VcLCV42hw
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 27, 2023
काय म्हणाले होते अमित शाह
कर्नाटकातील बेळगावी येथे मंगळवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, ‘काँग्रेसचे सरकार आल्यास राज्याचा विकास ‘रिव्हर्स गियर’मध्ये होईल. घराणेशाहीचे राजकारण शिगेला पोहोचेल आणि कर्नाटकला दंगलीचा फटका बसेल.
BJP & Sh. Amit Shah are insulting #Karnataka every day.
J.P.Naddaji says Kannadigas need blessings of Modi – not vice versa.
Can they not find a single #Kannadiga to hand over the State of # Karnataka to run the State that it has to be handed over to Modi?
BJP’s arrogance has… pic.twitter.com/1BrVeg7Ne4
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 25, 2023
दरम्यान, यापूर्वी काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही याबाबत ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, भाजप आणि अमित शहा दररोज कर्नाटकचा अपमान करत आहेत. जेपी नड्डाजी म्हणतात की कन्नडिगांना मोदींच्या आशीर्वादाची गरज आहे. राज्य चालवायला आणि मोदींच्या हाती एकही कन्नडिगा मिळू शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.