देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

157 new nursing colleges will be started across the country : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी देशात 157 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज (New Govt Nursing College) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 1 हजार 570 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया (Mansukh L. Mandaviya) यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांना पत्रकारांशी बोलतांना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत (CCEA) या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मांडविया यांनी दिली.

सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या मान्यतेबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले की, देशात 157 सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू केले जातील आणि येत्या 24 महिन्यांत ती पूर्ण करून राष्ट्राला समर्पित केली जातील. यासाठी 1 हजार 570 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. देशातील नर्सिंग व्यावसायिकांची संख्या वाढविण्यासोबतच दर्जेदार, परवडणारे आणि सर्वसमावेशक नर्सिंग शिक्षण देणे हा या निर्णयामागचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली.

वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढली
पुढे सांगताना केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, जिथे मेडिकल कॉलेज आहे तिथे 10 कोटी रुपयांच्या मदतीने नर्सिंग कॉलेज बांधले जाईल. मांडविया पुढे म्हणाले की, देशात वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढली आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 तयार करण्यात आले आहे. मांडविया यांनी सांगितले की या धोरणांतर्गत आम्ही सर्व वैद्यकीय उपकरण उद्योगांना प्रोत्साहन देऊ. ते म्हणाले की, येत्या 25 वर्षांत देशाला वैद्यकीय उपकरण क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी सरकार नियोजनबद्ध पद्धतीने काम करेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube