Download App

CM Siddaramaiah : ‘आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडू’ सिद्धरामय्यांचं आव्हान; ‘त्या’ व्हिडिओत नेमकं काय?

CM Siddaramaiah : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. यातच आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र सिद्धरामय्या मोबाइल फोनवर कथित बदलीबाबत बोलत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर वाद सुरू झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांन स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओत बदलीचा विषय नसला तरी खोटा अपप्रचार करण्यात येत आहे. पैसे घेऊन एक जरी बदली केल्याचे दाखवून दिले तर राजकारणातून निवृत्त होईन, असे आव्हानच त्यांनी दिले.

Karnataka Politics : काँग्रेसचं सरकार पडणार, 50 आमदार भाजपाच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

माजी आमदार डॉ. यतिंद्र फोनवर बोलत असताना त्यांनी सीएसआर नियडी शाळेच्या बांधकामाबाबत चर्चा केली. त्याचा विपर्यास करून चुकीचे चित्रण केल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली. यतिंद्र यांच्या भाषणात कुठेच बदलीचा उल्लेख नाही. सीएसआरच्या माध्यमातून शेतातील शाळांच्या इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्ती केली जात आहे. मंत्री एच. सी. महादेवाप्पा यांनी ही यादी दिली आहे. त्यावरच चर्चा झाल्याचे यतिंद्र यांनी सांगितले. तरीदेखील विरोधकांकडून फक्त गोंधळ निर्माण केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.

आमदार आपल्याच सरकारवर नाराज 

दरम्यान, कर्नाटकात याआधी चार महिन्यांपूर्वी एक राजकीय नाट्य घडले होते. राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकूण 20 मंत्री आपली कामे नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले गेले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटले होते की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

Tags

follow us