Download App

भीषण अपघात! टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकची जोरदार धडक, अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू

टेम्पो ट्रॅव्हलरने पुणे बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला पाठीमागील बाजूने धडक दिली.

Karnataka Road Accident : कर्नाटकात आज एक भीषण अपघात (Karnataka Road Accident) झाला. हा अपघात हावेरी जिल्ह्यातून जाणाऱ्या (Road Accident) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झाला. एक टेम्पो ट्रॅव्हलर (मिनी बस) या महामार्गावरुन जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालट्रकला पाठीमागील बाजूने धडक दिली. हा अपघात इतका भीषण (Accident) होता की ट्रॅव्हलरचा पुढील भागाचा चुरा झाला. या घटनेत एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक लहान मुलाचाही समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अन्य यंत्रणांचे पथक घटनास्थळी हजर झाले. वाहनांतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या अपघाताचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु, टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग खूप जास्त होता. याच कारणामुळे टेम्पोची धडक लॉरीला बसली असे सांगितले जात आहे. ज्यावेळी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते तेव्हाच अशा घटना घडतात. आता कर्नाटक पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासानंतरच अपघात नेमका कशामुळे झाला याचं खरं कारण समोर येईल.

Pune Accident मधील अल्पवयीन मुलाला वेळ द्या, त्याच्यावरही आघात; उच्च न्यायालयाने मांडलं मत

हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशु कुमारने या अपघाताची खात्री केली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला. ब्यादगी तालुक्यातील गुंडेनहल्ली परिसरात एक मालवाहतूक करणारी गाडी (लॉरी) उभी होती. याच गाडीला टेम्पो ट्रॅव्हलरने मागील बाजून जोराची धडक दिली. या अपघातातील मयत लोक शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील येमहट्टी गावातील रहिवासी होते. या ट्रॅव्हलरमध्ये एकूण 17 प्रवासी होते. हे सर्वजण सवादट्टीमधील येल्लम्मा मंदिरात दर्शन करून पुन्हा भद्रावतीकडे निघाले होते.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू

follow us