Karnataka Elections : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात

Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. यामध्ये पंतप्रधान […]

Karnataka

Karnataka

Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवारांची आज प्रचारसभा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्नाटकात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तर भाजप आणि कॉंग्रेससाठी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता, लोक बॅगा भरून तयार होते, सामनातून गौप्यस्फोट

दरम्यान आता आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काय- काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं फिरतंय. येत्या 10 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता असून भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांचं सुरु आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

Exit mobile version