Karnataka Assembly Election : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान करणाऱ्यांचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. कर्नाटकात येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसचे नेते मर्यादा सोडून प्रचार करताहेत, पंतप्रधान नरेंद मोदींवर टीका करीत आहेत. जेव्हा, जेव्हा मोदींविरोधात बोललं आहे, त्यावर मोदींनी प्रत्युत्तर नाही दिलं तर निवडणुकीत जनतेने बदला घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तसेच देशाची जनता मोदींचा अपमान सहन करणार नाही. येत्या 10 मे रोजी जनता विरोधकांनी मतदानातून उत्तर देणार असल्याचंही ते म्हणालेत. तसेच जसं महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार तसंच कर्नाटकातही डबल इंजिनचं सरकार आहे.
Bhaskar Jadhav : राजकारणात अंगावर आलेल्या सगळ्या पैलवानांना… भास्कर जाधवांचा निशाणा
महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्याआधी आम्ही दहा वर्षे मागे गेलो होतो, पण आता आम्ही पुन्हा रुळावर आलो असून डबल इंजिन सरकार मोठ्या ताकदीने काम करत असल्याच अनुभव आम्ही मागील आठ महिन्यात घेतला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्याचं राज्याच्या विकासाला बाधा येत नाही, अन्यथा अनेक स्पीडबेकर येतात. हजारो कोटींच्या निधीची मदत केंद्र सरकार डबल इंजिन सरकारला करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. तसेच या निवडणुकीत कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक शिवसैनिकांच्या मतांचा फायदा भाजपला होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, ही निवडणूक फक्त एकट्या कर्नाटकाची नसून देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. कर्नाटकात भाजपचं राजकीय वातावरण असून निवडणुकीत भाजपचाच बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.