Download App

VIDEO : ‘कन्नड बोलो मॅडम’…यह इंडिया है, फक्त हिंदीच बोलणार; SBI मॅनेजर अन् ग्राहकामध्ये जुंपली…

कन्नड भाषा बोलवण्यावरुन कर्नाटकातील बंगळुरुमधील एसबीआय बॅंकेचे मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये चांगलीच जुंपल्याचा व्हिडिओ समोर आलायं.

महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यावरुन अनेकदा वाद झाल्याचं आपण पाहिलंय. आता कर्नाटकातही कन्नड भाषेवरुन चांगलाच वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय. बंगळूरुमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बॅंक मॅनेजरला एका ग्राहकाने कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है या शब्दांत दम भरला. हा भारत आहे, फक्त हिंदीच बोलणार, या शब्दांत मॅनेजरने ग्राहकांना सुनावलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या एसबीआय बॅंकेतील हा व्हिडिओ असून बॅंकेच्या महिला मॅनेजरने ग्राहकांसोबत कन्नड भाषेत बोलण्यास थेट नकार दिलायं. त्यानंतर ग्राहक आणि बॅंक मॅनेजरमध्ये चांगलाच वाद झाला आहे. ग्राहक बॅंकेत आले होते. बॅंक मॅनेजरशी ही ग्राहक कन्नडी भाषेत बोलत होते, पण मॅनेजर हिंदी भाषेत बोलत असल्याने या ग्राहकाने कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. त्यावरुन दोघांमध्ये चांगला वाद झालायं.

शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळता येणार; फडणवीसांनी मान्सूनच्या आगमापूर्वी आखला मास्टर प्लॅन

व्हिडिओतील संवादानुसार, ग्राहक म्हणतायं, मॅडम कन्नड बोलो, यह कर्नाटक है. असं ही ग्राहक बॅंकेच्या मॅनेजरला म्हणाले. त्यावर बॅंक मॅनेजर म्हणाली, हा भारत आहे, मी फक्त हिंदीतच बोलणार, असं मॅनेजरने ठणकावून सांगितलंय. या घटनेनंतर ग्राहकाने मॅनेजरला आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनाच दाखवल्या. त्यामध्ये ग्राहकांशी स्थानिक भाषेत संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आलायं. मार्गदर्शक सूचना दाखवल्यानंतर मॅनेजर महिलेने कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन

याउलट तू काही मला नोकरी दिली नाही, या शब्दांत महिला मॅनेजरने ग्राहकाला सुनावलंय. मी कन्नडी भाषा बोलणारच नाही , असा रट्टाच बॅंक मॅनेजरने लावला. त्यावर सुपर मॅडम, सुपर या शब्दांत ग्राहकाने टोलेबाजी केलीयं.

follow us