Karnataka cabinet expansion : कर्नाटकात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पार पडला. यामध्ये राज्यपालांनी 24 मंत्र्यांना शपथ दिली. याआधी 20 मे रोजी सिद्धरामय्या यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता सिद्धरामय्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 34 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे सहा महिने आहे. 43 वर्षीय लक्ष्मी आर हेब्बाळकर या सर्वात तरुण मंत्री आहेत. चला जाणून घेऊया सिद्धरामय्या सरकारच्या सर्व मंत्र्यांबद्दल…
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नव्या सरकारमध्ये 34 मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. मंत्र्यांची सरासरी मालमत्ता 115 कोटी रुपये आहे. डीके शिवकुमार हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याकडे एकूण 1413 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर 970 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या कुटुंबाची संपत्ती 251 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते, तर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचे मूल्य 840 कोटी रुपये होते.
प्रतिज्ञापत्रानुसार शिवकुमार यांची 12 बँक खाती आहेत. यापैकी काही खाती त्यांचे भाऊ डीके सुरेश संयुक्तपणे सांभाळतात. त्यांच्या नावावर 225 कोटी रुपयांचे कर्जही आहे. शिवकुमार यांच्या नावावर टोयोटा कार आहे, ज्याची किंमत 8 कोटी 3 लाख रुपये आहे.
अमेरिकेतही भारतीय सणांचा डंका; खासदाराने केली थेट राष्ट्रीय सुट्टीची मागणी
दुसरीकडे, सर्वात कमी संपत्ती असलेल्या मंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा यांचे नाव त्यात समाविष्ट आहे. 61 वर्षीय बाळाप्पा यांच्याकडे 58.56 लाख रुपयांची संपत्ती आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेले ते सरकारमधील एकमेव मंत्री आहेत. याशिवाय इतर सर्व मंत्र्यांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे.
लक्ष्मी आर हेब्बाळकर या सिद्धरामय्या सरकारमधील सर्वात तरुण मंत्री आहेत. लक्ष्मी आर हेब्बाळकर ह्या 43 वर्षांची असून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या मंत्रिमंडळात लक्ष्मी या एकमेव महिला आहेत. डॉ. जी. परमेश्वरा हे सर्वाधिक शिक्षित मंत्री आहेत. 72 वर्षीय परमेश्वर यांनी पीएच.डी. केलेली आहे. यावेळी ते कोरटागेरे या सुरक्षित जागेवरून विजयी झाले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वरा यांच्याकडे 21 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राग; निशाणा नितीन गडकरी : धमकी कॉलचे PFI कनेक्शन उघड
मंत्री झालेल्या बी नागेंद्र यांच्यावर सर्वाधिक खटले आहेत. बेल्लारी (एसटी) मतदारसंघातील काँग्रेस आमदारावर 42 गुन्हे दाखल आहेत. या यादीत दुसरे नाव उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे आहे. त्यांच्यावर 19 गुन्हे दाखल आहेत. या यादीत तिसरे नाव राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आहे, ज्यांच्यावर 13 खटले आहेत.
मंत्र्यांच्या यादीत एन.एस. बोस राजू यांच्या नावाचाही समावेश आहे. बोसराजू हे विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही ठिकाणी आमदार राहिले आहेत. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा युनिटचे सचिव आहेत. मूळचे रायचूरचे आहेत, ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. काल त्यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली. यावेळी निवडणूक न लढविल्यामुळे त्यांच्या मालमत्तेची माहिती जुन्याच फॉर्ममध्ये टाकण्यात आली आहे.