Chief Minister Siddaramaiah : ‘मुडा’ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने (ED) आज मोठी कारवाई केली आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सिद्धरामय्या (Chief Minister Siddaramaiah) आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने शुक्रवारी ही माहिती दिली. दरम्यान, या कारवाईमुळं सिद्धरामय्या यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४२ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे बाजारभाव सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जप्त केलेली मालमत्ता वेगवेगळ्या लोकांच्या नावावर नोंदणीकृत आहे. हे लोक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि एजंट म्हणून काम करत आहेत.
ED, Bangalore has provisionally attached 142 immovable properties having market value of Rs. 300 Crore (approx.) registered in the name of various individuals who are working as real-estate businessmen and agents under the provisions of the PMLA, 2002, in connection with the case… pic.twitter.com/qbiFpkllh5
— ANI (@ANI) January 17, 2025
सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध म्हैसूरमधील लोकायुक्त पोलिसांकडे अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, भारतीय दंड संहिता, १८६० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत म्हैसूरच्या लोकायुक्त पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणाने (MUDA) अधिग्रहित केलेल्या ३ एकर १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात त्यांच्या पत्नी बीएम पार्वती यांच्या नावावर १४ आलिशान जागा घेतल्याचा आरोप आहे.
बीएम पार्वती यांना भरपाई म्हणून देण्यात आलेल्या पॉश भागातील १४ जागांची किंमत ५६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. जेव्हा एजन्सीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा असे आढळून आले की, मुडा आयुक्त डीबी नतेश यांनी जमिनीच्या बेकायदेशीर वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
सिद्धरामय्या यांच्यावर काय आरोप आहेत?
सिद्धरामय्या यांच्या पत्नीला MUDA कडून मोबदला म्हणून मिळालेला विजयनगरचा भूखंड त्यांच्या कसारे गावातील जमिनीपेक्षा अनेक पटीने मोठा आहे.
स्नेहमयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी सिद्धरामय्या यांच्यावर MUDAच्या जागेवर कौटुंबिक मालमत्ता असल्याचा दावा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला आहे.
१९९८ ते २०२३ पर्यंत, सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री अशी प्रभावी पदे भूषवली. या घोटाळ्यात त्यांचा थेट सहभागी नसला तरी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी आपली राजकीय शक्ती वापरल्याचा आरोप आहे.