Download App

कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स…

कर्नाटकात सत्ता कोणाचीही येऊ देत पण सीमावर्ती भागात असलेल्या एका घराण्यात मंत्रिपद असणार असं एक समीकरणच बनलेलं आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या एकाच घरात चार सख्खे भाऊ आमदार आहेत. बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी बंधू ठरवतील तीच पूर्व दिशा असणार , अशी परिस्थिती आहे. जारकीहोळी बंधूंपैकी तीन भाऊ विधानसभेत तर एक भाऊ विधान परिषदेत आमदार आहेत.

अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेलं जाकरहोळी घराण्यात पाच भाऊ आहेत. त्यापैकी चार भावंडांचा राजकारणात चांगलाच दबदबा आहे. तर एक भाऊ राजकारणातला दबंग म्हणून ओळखला जातो. रमेश आणि बालचंद्र जारकीहोळी सध्या भाजपमध्ये आहेत. तर लखन आणि सतिश जारकीहोळी काँग्रेसमध्ये आहेत. तसेच पाचवा भाऊ भिमाशी.

कर्नाटकात मतदारांची काँग्रेसला साथ तर भाजपचा सुपडासाफ

1999 पासून मोठा भाऊ रमेश जारकीहोळी गोकाक मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. कर्नाटकात अस्तित्वात असलेलं तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचं सरकारला सत्तेतून खाली खेचण्यात जारकीहोळी बंधूंचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी मुख्य सुत्रधाराची भूमिका बजावली होती. काही काळानंतर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.

रमेश जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ सेक्स स्कॅंडलचा होता. व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना त्यांच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रमेश भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत. रमेश यांनी 1999 मध्ये गोकाक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

Karnataka Election Result : बेळगावमध्येही कॉंग्रेसचाच बोलबाला; मतदारांची हातालाच साथ

त्यानंतर 2004, 2008, 2013 आणि 2018 मध्ये त्यांनी सलग निवडणुका जिंकल्या. त्यांना 2019 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत जागा जिंकली. दुसरा भाऊ बालचंद्र जारकीहोळी हे भाजपकडून अरभावी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हे दोघे भाजपमध्ये सक्रिय आहेत.

भालचंद्र जारकीहोळी हे भाजपच्या तिकिटावर अरभावी मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातल्या या मतदारसंघात 2018 मध्ये भाजपनेच विजय मिळवला होता.

Jio Cinema चा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच, आवडते शो पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे

सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. ते यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवला असून त्यांनी जवळपास 60.42 टक्के मते मिळवली आहेत. हिंदु शब्दावरुन विधान केल्याने ते मागील वर्षी चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी भाजपने त्यांना चांगलच ट्रोल केलं होतं. त्यावर काँग्रेसने हे विधान त्यांच वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं होतं.

तर चौथा भाऊ लखन जारकीहोळी काँग्रेसचा विधान परिषदेतील आमदार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने लखन जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळणार हे वेगळ सांगण्याची गरज नाही. लखन यांना अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगून त्याना विधानपरीषदेवर निवडून आणण्यात रमेश यांचाच प्रमुख वाटा आहे.

Karnataka Election Results: ‘बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली’, संजय राऊतांचा हल्लाबोल

२०१९ साली लखन यानी गोकाक मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती. बंधू रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातच त्यानी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती. त्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेल्या रमेश यांचा विजय झाला होता.

त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत लखन व रमेश एकत्र आले होते. या दोहोनी आपलेच बंधू व कॉंग्रेसचे उमेदवार सतीश यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सतीश याना पराभव स्विकारावा लागला होता.

Tags

follow us