कर्नाटकात मतदारांची काँग्रेसला साथ तर भाजपचा सुपडासाफ

कर्नाटकात मतदारांची काँग्रेसला साथ तर भाजपचा सुपडासाफ

Karnataka Assembly Election 2023 Results : कर्नाटकमध्ये शनिवारी (१३ मे) काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे विजयानंतर म्हणाले की, हा भाजपमुक्त दक्षिण भारत आहे. आपण युद्ध जिंकले आहे, परंतु आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निकालांशी संबंधित मोठ्या गोष्टी जाणून घ्या.

कर्नाटक विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. याचे निकाल आज जाहीर आले आहे. सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांना बहुमतासाठी 113 ही मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. दरम्यान या निवडणुकीत विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले. काँग्रेसने 42.9 टक्के मतांसह 136 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 36 टक्के मतांसह केवळ 65 जागा जिंकता आल्या. जनता दलने 13 टक्के मतांसह 19 जागा जिंकल्या आहेत. तर इतर 04 जागा मिळाल्या आहेत.

Karnataka Election Results : सिद्धरामय्यांच्या जादू पुढं जेडीएसच्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त

विशेष म्हणजे 2023 च्या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस तब्बल 10 वर्षांनंतर स्वबळावर सत्तेवर आली आहे. या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात असलेल्या दक्षिणेकडील एकमेव राज्यातून भाजपला काँग्रेसने बाहेर काढले. दरम्यान गेली विधानसभा म्हणजेच कर्नाटकात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 72.13 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर भाजपने 36.4 टक्के मते मिळवून 104 जागा जिंकल्या. काँग्रेसने 38.6 टक्के मतांसह 78 जागा जिंकल्या होत्या. जेडीएसला 20.6 टक्के मतांसह 37 जागा मिळाल्या होत्या.

Karnataka Election Result: एचडी कुमारस्वामी जिंकले, पण एक स्वप्न भंगले

जेडीएसला फटका तर काँग्रेसला फायदा
कर्नाटक निवडणुकीत भाजपला फटका बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या मात्र त्यांची मतांची टक्केवारी कमी झालेली नाही. तर दुसरीकडे या निवडणुकीत मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये जेडीएसला मोठा फटका बसल्याचे आकडेवरतीउं स्पष्ट होत आहे.

Karnataka Election : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर शिष्याकडूनच पराभूत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनंतर जेडीएसच्या वोट बँकेचा काही भाग काँग्रेसकडे गेला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कारण, भाजप आपली मतांची टक्केवारी सांभाळून आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला 18 टक्के मते मिळाली होती, ती यंदा सुमारे 13 टक्क्यांवर आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमालीची वाढली आहे. यामुळे ही निवडणुकीत मतदारांनी जेडीएसला नाकारत काँग्रेसला साथ दिली आहे.

Karnataka Election Result: डीके शिवकुमार की सिद्धरामय्या; कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण?

काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली ‘पाच’ आश्वासने
काँग्रेसने निवडणूक प्रचारात पाच महत्त्वाची आश्वासने कर्नाटकच्या जनतेला दिली होती. त्याचा निकाल हा प्रत्यक्षात त्यांच्या विजयाने दिसून देखील आला आहे. दरम्यान काँग्रेसने कोणती आश्वासने दिली होती ती आपण जाणून घेऊ. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे सरकार आल्यास ‘गृह ज्योती’ योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंब चालवणाऱ्या गृहिणींनी दरमहा 2000 रुपये दिले जातील.

कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार; विजयांनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

राज्यात आमचे सरकार येताच सर्व महिलांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिले जाईल. पक्षाने पदवीधर तरुणांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. तर डिप्लोमाधारकांना दरमहा 1500 रुपये दिले जातील, अशी घोषणा केली होती. काँग्रेसने अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ देण्याचे वचन दिले. ही आश्वासने पक्षासाठी महत्त्वाची ठरली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube