Karnataka Election Result: डीके शिवकुमार की सिद्धरामय्या; कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण?

Karnataka Election Result: डीके शिवकुमार की सिद्धरामय्या; कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण?

Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार? याची उस्तुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर देखील मुख्यमंत्री कोण असणार याचा सस्पेंस आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार ठराव मंजूर करून हा निर्णय हायकमांडवर पाठवू शकतात, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

वास्तविक, सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. अशा स्थितीत दोघांपैकी एकाची निवड करणे काँग्रेससाठी कठीण काम ठरू शकते.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसने पाठवलेले केंद्रीय निरीक्षक विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत सूचना घेणार आहेत. सर्व आमदार एक ओळीचा ठराव पास करतील की मुख्यमंत्री कोण होणार. हा काँग्रेस हायकमांडने पठवला जाईल. त्यानंतर हायकमांड मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत.

आर अशोक यांचा पराभव करून DK Shivakumar सुमारे एक लाख मतांनी विजयी

तत्पूर्वी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जे वचन दिले होते ते मी पूर्ण केले आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या होत्या हे मी विसरू शकत नाही. विश्वास दाखवल्याबद्दल मी गांधी परिवार आणि सिद्धरामय्या यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो.

कोण आहेत डीके शिवकुमार?
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे जाहीर केली होती. एक्झिट पोलमध्ये देखील डीके शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चे होते. डीके शिवकुमार यांना वोक्कलिगा समाजाचा कर्नाटकात मोठा पाठिंबा आहे. 1980 पासून डीके काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. 1989 मध्ये डीकेंनी सथनूर विधानसभेतून थेट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी आताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सथनूरमधून दारुण पराभव केला होता. 2013 मध्ये कनकपुरातून पीजीआर सिंधिया या दिग्गज नेत्यालाही त्यांनी धूळ चारली होती.

Sushama Andhare : हे निकाल ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, म्हणणाऱ्यांसाठी चपराक

सिद्धरामय्या कोण आहेत?
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धरामय्या यांच्याकडे पाहिले जाते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील सिद्धरामय्या भावी मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर होते. सिद्धरामय्या यांचा म्हैसूर भागातील लिंगायत मतदारांवर मोठा प्रभाव आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मूळचे म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामनहुंडीचे असून 2013 ते 2018 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या हे पूर्वी जेडीएसचे मोठे नेते मानले जात होते. त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्यासोबत काम केले होते. पण जेव्हा देवेगौडांनी आपला मुलगा कुमारस्वामी यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले त्यावेळी संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी पक्ष सोडला. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube