HD Revanna arrested : कर्नाटक सेक्स स्कँडल केस आणि पेन ड्राईव्ह केसमध्ये एसआयटीने आज मोठी कारवाई केली आहे. एसआयटीने पूर्व मंत्री आणि जेडीएस आमदार एचडी रेवन्ना (HD Revanna)यांना आज अटक केली आहे. रेवन्ना यांना यांना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांच्या पद्मनाभनगर येथील घरातून अटक करण्यात आली.
#WATCH | Karnataka: JD(S) leader HD Revanna brought to SIT office for questioning
He has been taken into custody by SIT officials in connection with a kidnapping case registered against him at KR Nagar police station, in Bengaluru. pic.twitter.com/MJJ8xjNFbf
— ANI (@ANI) May 4, 2024
रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. सेक्स स्कँडल उघडकीस येताच प्रज्वल रेवन्ना हे देश सोडून पळून गेल्याचे बोलले जात आहे. तसेच या प्रकरणात जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एचडी रेवन्ना यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Loksabha Election : शरद पवारांनी चारवेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांचा हल्लाबोल
एचडी रेवन्नाच्या घरातील मोलकरीण काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार महिलेच्या मुलाने नोंदवली होती. यानंतर एचडी रेवन्नांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या महिलेचा व्हिडिओही सेक्स स्कँडल प्रकरणात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एचडी रेवन्ना यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दरम्यान, एसआयटीचे पथक आज त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
… तर पवारांची औलाद सांगणार नाही, अजित पवारांची भरसभेत मोठी घोषणा
कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी या अपहरण केलेल्या महिलेचा शोध घेतला. म्हैसूर जिल्ह्यातील कालेनाहल्ली गावात जेडीएस आमदार एचडी रेवन्ना यांचे स्वीय सहाय्यक (पीए) राजशेखर यांच्या फार्महाऊसमधून या महिलेची सुटका करण्यात आली.
दरम्यान, सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी वाढू शकतात. लैंगिक शोषणाचे आरोप समोर आल्यानंतर प्रज्वल परदेशात पळून गेल्याने केंद्रीय तपास यंत्रणा झाली असून त्यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी होण्याची शक्यता आहे.