Karnatak Election 2023 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी पिछाडीवर

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 13T123222.218

Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली पण स्पष्टपणे काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. पण यावेळी देखील जेडीएस किंगमेकर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये जेडीएसचे नेते  व माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू पिछाडीवर गेले आहेत.

JD(S) नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी सध्या रामानगरममधून पिछाडीवर आहेत. जवळपास 13 हजार मतांनी ते पिछाडीवर आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, निखिल कुमारस्वामी यांना रामनगरम जागेवरून 47,891 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे इक्बाल हुसेन निखिलच्या पुढे आहेत. हुसेन यांना 61,353 मते मिळाली असून, भाजपचे गौतम मारिलिंग गौडा यांना 8701 मते मिळाली आहेत.

बेळगावात काँग्रेस सुसाट! तब्बल ‘इतक्या’ जागांवर घेतली आघाडी; भाजपाची पिछेहाट

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत JD(S) चे HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसच्या इक्बाल हुसेन यांचा पराभव करून जागा जिंकली. मात्र, कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून पराभूत झाला होता. यावेळी आता विधानसभा निवडणुकीतही त्याचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Karnataka Election : काँग्रेस नेत्याचा दावा! ‘या’ एकाच घोषणेनं केला भाजपाचा पराभव निश्चित

दरम्यान, कांग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे स्वतः पिछाडीवर दिसत आहे. जवळपास 14 हजार मतांनी शेट्टर हे मागे पडले आहेत. यामुळे जगदीश शेट्टर हे पराभवाच्या छायेत गेल्याचे बोलले जात आहे. आपले तिकीट कापल्याने शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा 25 ते 30 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव असल्याचे बोलले जात होते पण आता त्यांचीच अडचण झाल्याचे दिसून येते आहे.

Tags

follow us