बेळगावात काँग्रेस सुसाट! तब्बल ‘इतक्या’ जागांवर घेतली आघाडी; भाजपाची पिछेहाट

बेळगावात काँग्रेस सुसाट! तब्बल ‘इतक्या’ जागांवर घेतली आघाडी; भाजपाची पिछेहाट

Karnataka Election Result Live Update : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी तब्बल 11 जागांवर आघाडी घेतली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची मोठी पिछेहाट झाली आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघात समितीचे उमेदवार जोरदार लढत देत आहेत.

Karnataka Elections Result 2023 : जनतेने भाजपला गांधी परिवाराला बेघर केल्याची शिक्षा दिली, नाना पटोलेंचं टीकास्त्र

निपाणी मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील आघाडीवर होते. मात्र आता चित्र बदलले आहे. भारतीय जनता पार्टीच्या शशिकला जोल्ले येथे आघाडीवर आहेत. त्यानंतर पुन्हा पाटील 1582 मतांनी आघाडीवर होते.

यमकनमर्डी मतदारसंघात सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदारसंघात रमेश जारकीहोळी आघाडीवर आहेत. उत्तर मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अंजली निंबाळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

यंदा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती राहिल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे भाजपने दुसऱ्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते जेडीएस नेत्यांशी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

कर्नाटकात सत्तारूढ होण्यासाठी BJP कुमारस्वामींच्या संपर्कात, कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, कुमारस्वामींशी संपर्क होईना?

दुसरीकडे काँग्रेसही सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही समजते. यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजून पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र सध्याच्या स्थितीवरून तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube