Karnataka Elections Result 2023 : जनतेने भाजपला गांधी परिवाराला बेघर केल्याची शिक्षा दिली, नाना पटोलेंचं टीकास्त्र

Karnataka Elections Result 2023 : जनतेने भाजपला गांधी परिवाराला बेघर केल्याची शिक्षा दिली, नाना पटोलेंचं टीकास्त्र

Nana Patole On Karnataka Elections Result 2023 : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP)अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून कॉंग्रेस (Congress) आघाडीवर असल्याचं दिसत होतं. दरम्यान, आता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

यावर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पटोले म्हणाले, गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली आहे. देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु झाल आहे. तर अनपढ व्यवस्था देशातील सत्तेत बसलेली असून भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. पटोले हे जालनामार्गे विदर्भात जात असताना ते जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Karnataka Election : काँग्रेस नेत्याचा दावा! ‘या’ एकाच घोषणेनं केला भाजपाचा पराभव निश्चित

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजपसह जेडीएसलाही झटका बसला आहे. निवडणुक आयोगाने २२४ पैकी २२३ जागांचे कल जारी केले आहेत.

काँग्रेस- ११५ जागा, ४३.१ टक्के मतं
भाजप- ७३ जागा, ३६.२ टक्के मतं
जेडीएस- ३० जागा, १२.८ टक्के मतं
इतर- ५ जागा

Karnatak Election 2023 : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पराभवाच्या छायेत

कर्नाटकमध्ये काँग्रेसची विजयी घौडदौड सुरू असून निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आतिशबाजी आणि गुलाल उधळत करत जल्लोष करण्यात आलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube