Karnatak Election 2023 : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पराभवाच्या छायेत
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते आहे. काँग्रेस सध्या 115 जागांवर आघाडीवर असून भाजपा 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार देखील पिछाडीवर दिसत आहे तर काही जागांवर भाजपचे दिग्गज देखील मागे पडले आहेत.
यावेळी कर्नाटकमध्ये भाजपने तिकीट देताना आपल्या गुजरात पॅटर्नचा वापर केला. यावेळी त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांची तिकिटे कापली. त्यामुळे निवडणुकीआधी चांगलेच वातावरण तापले होते. भाजपने आपले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे तिकीट कापले यानंतर नाराज होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे
जगदीश शेट्टर हे कर्नाटक मधील मोठे नेते असून लिंगायत समाजाचे देखील मोठे नेते मानले जातात. कर्नाटक मध्ये लिंगायत समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान आहे. भाजपचे नेते येदियुरप्पा हे देखील लिंगायत समाजातूनच येतात.
पण आता जगदीश शेट्टर हे स्वतः पिछाडीवर दिसत आहे. जवळपास 14 हजार मतांनी शेट्टर हे मागे पडले आहेत. यामुळे जगदीश शेट्टर हे पराभवाच्या छायेत गेल्याचे बोलले जात आहे. आपले तिकीट कापल्याने शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा 25 ते 30 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव असल्याचे बोलले जात होते पण आता त्यांचीच अडचण झाल्याचे दिसून येते आहे.
Karnataka Election Result : तरीही विजय आमचाच! भाजपाच्या ‘या’ नेत्याने मांडलं हटके गणित
दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले होते. ते जिथे जिथे गेले आहेत, तिथे तिथे भाजपाचा (BJP) मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली होती.