Download App

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या अडचणीत वाढ! केरळ न्यायालयाकडून वारंट जारी, काय आहे प्रकरण?

आयुर्वेदिक औषधांबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि दिव्या फार्मसी (Divya Pharmacy) पुन्हा अडचणीत आली

  • Written By: Last Updated:

Baba Ramdev: आयुर्वेदिक औषधांबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि दिव्या फार्मसी (Divya Pharmacy) पुन्हा अडचणीत आली. इंग्रजी आणि मल्याळम वृत्तपत्रांमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याप्रकरणी केरळच्या न्यायालयाने (Kerala court) त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलाय. दिव्य फार्मसीचे सह-संस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध हे वॉरंट आहे.

कार्यकर्त्यांना  ताकीद द्यावी, अन्यथा मी परळीत येऊन धडा शिकवेन; तृप्ती देसाईंचा मुंडेंना इशारा 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध १६ जानेवारी रोजी वॉरंट जारी करण्यात आलं होतं. पलक्कडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय II यांना हे वारंट जारी केलं. या प्रकरणाची पुढील तारीख १ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. दिव्य फार्मसी ही पतंजली आयुर्वेदाची उपकंपनी आहे.

तक्रार कशासाठी?
पलक्कडच्या औषध निरीक्षकांनी दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून, औषधे आणि जादूई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम १९५४ च्या कलम ३, ३(ब) आणि ३(ड) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ३ अन्वये विशिष्ट रोग आणि विकारांच्या उपचारासाठी काही औषधांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. कलम ३(ड) नुसार, कोणत्याही आजार, विकार आणि आजाराचे निदान, उपचार किंवा प्रतिबंध करण्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.

Saiee Manjrekar : सईचा स्टायलिश लूक, लेदर जॅकेटमधील फोटो व्हायरल 

दरम्यान, या प्रकरणात दिव्या फार्मसीला पहिलं आरोपी बनवण्यात आलं.आचार्य बालकृष्ण यांना दुसरे आरोपी बनवण्यात आले आहे. तर या प्रकरणात बाबा रामदेव यांना तिसरे आरोपी बनवण्यात आले.

दरम्यान, याआधीही औषधांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्यामुळं बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांना जाहीर माफी मागावी लागली होती.

 

follow us