मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय?

Baba Ramdev : योगगुरू रामदेव बाबा यांच्या (Baba Ramdev) अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने (Kerala Court) बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव यांच्या व्यतिरिक्त पंतजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्या विरुद्धही वॉरंट जारी करण्यात आले आहे. केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयाने हे वॉरंट दोघे सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने जारी केले आहे. केरळच्या अन्न निरीक्षकाने दिव्य फार्मसी विरोधात दावा दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण न्यायालयात हजर राहिले नव्हते.

मोठी बातमी! रामदेव बाबांच्या पतंजलीला FSSAI चा दणका; कंपनीला दिला ‘हा’ आदेश

यानंतर न्यायालयाने दोघांच्या गैरहजेरीची दखल घेत त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता त्यांना 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. याआधी 1 फेब्रुवारी रोजीही न्यायालयाने असेच जामीनपात्र वॉरंट जरी केले होते. जेणेकरून ते न्यायालयात हजर राहू शकतील. दिव्य फार्मसी द्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारीत करण्यासंदर्भातील हे प्रकरण आहे. यावर केरळच्या ड्रग इंस्पेक्टरने कारवाई केली.

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडवर अनेक प्रकरणे आहेत. यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अवमानना आणि ट्रेडमार्क उल्लंघन यांसारखी प्रकरणे दाखल आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि पतंजली कंपनीला दिलासा दिला आहे. परंतु, कोर्टाने त्यावेळी त्यांना इशारा दिला होता की जर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले तर त्यांना शिक्षा होऊ शकते.

सुप्रीम कोर्टाकडून माफीचा स्वीकार

पतंजलीच्या भ्रामक जाहिरात प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या माफीचा स्वीकार केला होता. त्यानंतर अपमानाचे प्रकरण बंद करण्यात आले होते. पतंजलीच्या कापूर या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्यावर कोरोना बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हटल्याचा आरोप केला होता.

रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड

मुंबई हायकोर्टाने अंतरिम आदेशात पतंजली आयुर्वेदला कापूर उत्पादने न विकण्यास सांगितले होते. मंगलम ऑरगॅनिक्ससोबत सुरू असलेल्या ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित सुनावणी सुरू आहे. एका प्रतिज्ञापत्रात पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube