रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड

  • Written By: Published:
रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड

Mumbai High Court Fined Patanjali : योग गुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या पतंजली कंपनीला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या एका आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. पतंजलीला (Patanjali) सोमवारी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबईबरोबर दिल्ली हायकोर्टाने ही पतंजलीला काही औषधे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मंगलम ऑरगॅनिक्सच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आय. छागला यांनी हा आदेश दिला.

…अन् बाकी सगळे उंदीर दूध पीत आहेत, जातीय संघर्षावर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य

मुंबई हायकोर्टाने अंतरिम आदेशात पतंजली आयुर्वेदाला कापूर उत्पादने न विकण्यास सांगितले होते. मंगलम ऑरगॅनिक्ससोबत सुरू असलेल्या ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित सुनावणी सुरू आहे. एका प्रतिज्ञापत्रात पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.

पतंजलीकडून न्यायालयाला सांगितले की 24 जून रोजी आदेश निघेपर्यंत विक्रेत्यांना 49 लाख रुपयांची उत्पादने पुरवण्यात आली होती. विक्रेत्यांकडे अजूनही 25 लाख रुपयांची उत्पादने असून त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्याविरोधात मंगलम ऑरगॅनिक्सच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की पतंजलीने 24 जूननंतरही कापूर संबंधित उत्पादने विकली आहेत. 8 जुलैपर्यंत ही उत्पादने पतंजलीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी होती. ही माहिती पतंजलीने आपल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून दिली नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने पतंजलीला फटकारले आहे. पतंजलीने आपल्या आदेशाचा अवमान केली आहे. ज्यासाठी कंपनीला 50 लाख रुपये जमा करावे लागतील. यानंतर 29 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने पतंजलीला आणखी 4 कोटी रुपये जमा करण्यास सांगिचले आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी खूशखबर ! चार हजार कोटी मिळणार, शासन निर्णयात अटी काय आहेत ?

पतंजलीला दावा आयुर्वेदाची बदमानी करू शकतो
तर आणखी एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीला एक आदेश दिला आहे. कोविड महामारीदरम्यान लाखो मृत्यूंना ॲलोपॅथी डॉक्टर जबाबदार असल्याचा दावा मागे घेण्यास पतंजलीला कोर्टाने सांगितले. पतंजली आणि तिच्या प्रवर्तकांनी येत्या तीन दिवसांत या दाव्यांच्या संबंधितील माहिती त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून काढून टाकल्या नाहीत, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना त्यांच्या पोस्ट काढून टाकण्यास सांगितले जाईल. कोविड दरम्यान लाखो मृत्यूंसाठी ॲलोपॅथिक डॉक्टरांना जबाबदार धरण्याचा पतंजलीचा दावा धोकादायक आहे. कोरोनिल हा कोरोनावर बरा असल्याचा पतंजलीचा दावा सामान्य लोकांचे नुकसान करू शकतो आणि आयुर्वेदाची बदनामी करू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube