…अन् बाकी सगळे उंदीर दूध पीत आहेत, जातीय संघर्षावर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य

…अन् बाकी सगळे उंदीर दूध पीत आहेत, जातीय संघर्षावर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य

Raj Thackeray : राज्यात सातत्याने जातीय संघर्षाच्या घटना घडत आहेत. काहीच दिवसांपूर्वीच विशाळगडावर हिंसाचार झाला होता. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात जातीय संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाराष्ट्रातील जातीय संघर्षावर मार्मिक भाष्य केले आहे.

‘…त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’; आदित्य ठाकरेंचा रोख कुणाकडे? 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस (S. D. Fadnis)हे आज (ता. 29) 100 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी संबोधित करतांना राज ठाकरे म्हणाले, शि. द. फडणीस यांचे एक व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रात एक मांजर आहे आणि तिची पिल्लं दूध पित आहेत. त्यात एक उंदीरदेखील आहे. एक वात्सल्याचा तो भाव आहे. जर आज मी ते व्यंगचित्र काढायला घेतलं असतं तर मी दाखवीन की मांजर तिथेच आहे. पिल्ले त्यांच्या अंगावरच्या पट्ट्यांमुळे भांडत आहे. मी या जातीचा, तू कोणत्या जातीचा? बाकी सगळे उंदीर दूध पीत आहेत आणि मांजर म्हणजे महाराष्ट्र, असं राज ठाकरे म्हणाले.

अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर मोठा अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक 

पुढं बोलतांना ठाकरे म्हणाले, शि द फडणीस सरांना फक्त ‘व’ ने वाचवलं आहे. ते फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

…वय नसतानाही सरकार वाकलेलं
राज ठाकरे म्हणाले, शि द सरांची घरी गेल्यावर दृष्ट काढा. एक-दोन जणांनी नाही तर सर्वांना दृष्ट काढा. ते आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. फडणीस हे 100 व्या वर्षातही अतिशय ताठपणे चालत आहेत, तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं तरी पुरे आहे. कारण एवढं वय नसतानाही सरकार  वाकलेलं आहे, असा टोला त्यांना महायुती सरकारला लगावला. सरकारमध्ये जास्त बाहेरची लोकं घेऊ का, या झाडाची फळं पाहिजेत, त्या झाडाची फळं पाहिजेत असं करू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी सरकारला दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube