मशिदी आणि मदरसे बांधतात, ‘शरबत जिहाद’ पासून स्वतःचे रक्षण करा ; बाबा रामदेवांचा व्हिडिओ व्हायरल

मशिदी आणि मदरसे बांधतात, ‘शरबत जिहाद’ पासून स्वतःचे रक्षण करा ; बाबा रामदेवांचा व्हिडिओ व्हायरल

Baba Ramdev On Sharbat Jihad: योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर  ‘पतंजली ज्यूस’ चे प्रमोशन करताना त्यांनी “शरबत जिहाद” (Sharbat Jihad) असा शब्द वापरला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या विरोधात टीका होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक प्रसिद्ध शरबत उत्पादक कंपनी त्यांच्या नफ्यातून मशिदी आणि मदरसे बांधत आहे. असा दावा केला आहे.

त्यामुळे लोकांनी पतंजलीचे गुलाबाचे सरबत खरेदी करावे असा अहवान देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे. हा व्हिडिओ ‘पतंजली प्रॉडक्ट्स‘ ने फेसबुकवर हिंदीमध्ये कॅप्शनसह शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते, “‘शरबत जिहाद’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या शीतपेये आणि टॉयलेट क्लीनर्सच्या विषापासून तुमच्या कुटुंबाला आणि निष्पाप मुलांना वाचवा. फक्त पतंजली शरबत आणि ज्यूस घरी आणा.”

बाबा रामदेव काय म्हणाले?

बाबा रामदेव यांनी शीतपेयांवर टीका केली आणि त्यांची तुलना शौचालय स्वच्छ करणाऱ्यांशी केली. ते म्हणाले की, उन्हाळ्यात तहान भागवण्याच्या नावाखाली लोक कोल्ड्रिंक्स पितात, जे प्रत्यक्षात टॉयलेट क्लीनरसारखे असतात. एकीकडे टॉयलेट क्लीनरसारख्या विषाचा हल्ला आहे आणि दुसरीकडे एक कंपनी आहे जी शरबत विकते आणि त्यातून मिळवलेल्या पैशातून मशिदी आणि मदरसे बांधते. बरं, तो त्यांचा धर्म आहे.

तहव्वुर राणाच्या टार्गेटवर होता ‘कुंभमेळा’; एनआयएच्या माजी महानिरीक्षकांचा धक्कादायक खुलासा 

जर तुम्ही सरबत प्याल तर ते मशिदी आणि मदरशांच्या बांधकामाला पाठिंबा देईल पण जर तुम्ही पतंजलीचे गुलाबाचे सरबत प्याल तर गुरुकुल, आचार्यकुलम, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ प्रगती करेल. ज्याप्रमाणे लव्ह जिहाद आणि व्होट जिहाद आहे, त्याचप्रमाणे शरबत जिहाद देखील आहे आणि या शरबत जिहादपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube