Download App

पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण? मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेत ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती

  • Written By: Last Updated:

Mood of the Nation Survay : 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दशकभर आपली जादू कायम ठेवली आहे. वेगवेगळ्या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत मोदींना भापजला (BJP) निर्विवाद यश मिळवून दिले आहे. दरम्यान, इंडिया टुडेने ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood of the Nation) च्या सर्व्हेक्षण मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा अंदाज आहे. पंतप्रधान मोदींशिवाय त्यांची जागा घेण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असा प्रश्नही सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.

‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार 

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. दरम्यान, ‘मूड ऑफ द नेशन’च्या ओपिनियन पोलने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत सहज विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सर्वेक्षणादरम्यान पंतप्रधानांचा उत्तराधिकारी कोण असेल, असा प्रश्नही लोकांना विचारण्यात आला. मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शाह यांना 29 टक्के लोकांनी पसंती दिली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या खाली आहेत. त्यांना 25 टक्के लोकांनी पसंती दिली. पंतप्रधानपदासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली.

पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या ! 

मूड ऑफ द नेशन सर्व्हेत सर्व लोकसभा मतदारसंघातील 35,801 लोकांचे सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान पूर्ण झाले.

2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत अजिबात घट झालेली नाही. 2014 पासून, मोदी आणि शाहा या जोडीने अनेक निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती विजय मिळवून दिला आहे. शाह यांना भाजपचे चाणक्यही म्हटले जात होते. भाजपला पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते उत्तर भारतीय राजकारणातील प्रमुख नेते म्हणून उदयाला आले. आजही हिंदू धर्माचा खंबीर प्रचारक आणि गुन्हेगारांवर कारवाई करणारा खंबीर नेता म्हणून त्यांची देशात ओळख आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे नेते आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ओळख आहे. नितीन गडकरी हे त्यांच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार, कंत्राटदारांवर अंकुश आणि बाबूशाहीला आळा घालण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

follow us