IIT Baba Abhay Singh Story: प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभाची (Maha Kumbh 2025) सुरुवात झाली आहे. महाकुंभासाठी संपूर्ण जगातून संत आणि ऋषी प्रयागराजमध्ये दाखल झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे आयआयटी बाबा अभय सिंग (IIT Baba Abhay Singh). सध्या आयआयटी बाबा अभय सिंग सोशल मीडियावर चर्चेत आहे.
माहितीनुसार, आयआयटी बाबा अभय सिंग हरियाणातील (Haryana) झज्जर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी आयआयटी मुंबई (IIT Mumbai) येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये बी.टेक (B.Tech) केले आहे. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये लाखो पगाराच्या पॅकेजवर नोकरी देखील केली मात्र त्यानंतर सर्वकाही सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. यामुळे सध्या सोशल मीडियावर आयआयटी बाबा अभय सिंग ट्रेंड करत आहे. यातच त्यांनी स्वतः ताबद्दल एका मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
या मुलाखतीमध्ये आयआयटी बाबा अभय सिंग म्हणाले की, या जगाला लेबल्स आवडतात पण मला ते आवडत नाहीत. माझे ध्येय मुक्ती मिळवणे आहे पण नोकरी मला मुक्ती मिळवण्यापासून रोखत होती. जेव्हा तुम्ही एकाच लेबलमध्ये अडकता तेव्हा तुमची वाढ थांबते. म्हणूनच मी वेगळ्या दिशेची वाट धरली. असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.
पुढे बोलताना बाबा अभय सिंग म्हणाले की, जेव्हा मी माझ्या स्वतःच्या घरात ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मला कुटुंबातील लोक वेडा समजू लागले होते पण मी ध्यान करत होतो आणि जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मी खालच्या नाहीतर उच्च पदावर पोहोचलो. मी जेव्हा आयआयटीमध्ये गेलो तेव्हा पुढे काय करायचे हे मला कळले. तसेच नोकरीमध्ये मला तेच तेच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नव्हतं म्हणून मी अध्यात्माकडे वळलो. तसेच यापूर्वी काहीकाळ फोटोग्राफी आणि डिझायनिंगशी संबंधित काम करत होते ज्यात मला माझा येत होती. असा खुलासा देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.
मानसशास्त्रज्ञाकडे जाण्याचा सल्ला
मात्र काही दिवसानंतर मला फोटोग्राफी करावीशी वाटली नाही आणि मला मानसिक आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या. त्यानंतर मी साधना करायला सुरुवात केली आणि मानसिक त्रास होत असल्याने रात्री झोप येत नव्हती. मग मी विचार केला मन म्हणजे काय? तो शांत का होत नाही? मन शांत करण्यासाठी त्या काळात अनेक पुस्तके वाचली असं देखील बाबा म्हणाले. तसेच या काळात कुटुंबापासून ते बाहेरच्या लोकांपर्यंत सर्वजण मला वेडा समजत होते आणि अनेकांनी मला मानसशास्त्रज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला असेही या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले.
गुरूने आयुष्य बदलून टाकले
पुढे बोलताना बाबा अभय सिंग म्हणाले की, घर सोडल्यानंतर बनारसमध्ये सोमेश्वर पुरी बाबा भेटले आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. महादेव हे ज्ञानाचे स्रोत आहेत महादेवाच्या नगरी, काशीमध्ये गुरु सापडले. त्यांनी पाहताच मला ओळखले आणि अघोरी आणि नागा साधूंकडे नेले. असं देखील ते म्हणाले.
सिंघम IPS शिवदीप लांडे, आता दिसणार नाही ‘पोलीस गणवेशात’, राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा
तसेच सोमेश्वर पुरी बाबांनी त्यांना शा लोकांची भेट घडवून दिली ज्यांनी 20-20 वर्षांपासून अन्न-पाणी सोडले होते आणि दीक्षा दिली. त्यामुळे आयुष्य पूर्णपणे बदलले. असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.