भयंकर! तरुणीला जंगलात घेऊन जात युट्यूबर्सकडून आळीपाळीने अत्याचार, नक्की काय घडलं?
पीडितेनं संबंध ठेवण्यास नकार दिला. यावेळी चारही आरोपींनी पीडितेशी जबरदस्ती करत तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली.

हरियाणातील पानिपत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Rain) येथे काही युट्यूबर्सने एका तरुणीला जंगलात घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार यूट्यूबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
ही घटना हरियाणातील पानिपत येथील आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेवर वेश्याव्यवसायाचा आरोप केला आहे. सदर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पीडित तरुणीने सांगितलं की, ‘ती एका वसाहतीत राहते. तीन दिवसांपूर्वी ती रिफायनरी रोडवरील जंगलातून लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती, जिथे जवळच्या गावातील अनेक महिला लाकूड आणि गवत गोळा करण्यासाठी येतात.
स्टार प्लसच्या शुभारंभमुळे मिळाला कुटुंबासोबत क्वालिटी टाइम – नेहा हरसोरा
त्या दिवशी ती लाकूड गोळा करायला गेली असता, त्या परिसरात तिची किरण नावाच्या महिलेशी भेट झाली. जी पत्रकार असल्याचा दावा करत होती. तिच्यासोबत इतर तीन तरुण होते. त्यांनी स्वतःची ओळख अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप अशी करून दिली. हे चौघेही एका कारमधून आले होते. यावेळी किरणने सांगितलं की, ‘तू येथे घाणेरडे काम करतेस. तुला या तीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतील.
परंतु, पीडितेनं संबंध ठेवण्यास नकार दिला. यावेळी चारही आरोपींनी पीडितेशी जबरदस्ती करत तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली. निर्जन ठिकाणी गेल्यानंतर तिघांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी पीडितेनं विरोध केला असता आरोपींनी तिला मारहाण केली. हा सगळा प्रकार घडत असताना महिला यूट्यूबर घटनास्थळापासून काही अंतरावर हातात काठी घेऊन पाळत ठेवत होते. जेणेकरून इतर कोणीही तिथे येऊ नये.
आरोपी सामूहिक अत्याचापर्यंत थांबले नाहीत. त्यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितला तर तुझा व्हिडीओ मीडियामध्ये प्रसारित करून बदनामी करू, अशी धमकी देखील दिली. दरम्यान, या परिसरात इतर चार ते पाच महिला लाकूड गोळा करण्यासाठी आल्या. या सर्वांना पाहून चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी आता सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.