पाक गुप्तहेराच्या प्रेमात पडत देशाशी गद्दारी; युट्यूबर ज्योती मल्होत्रा कोण ?

  • Written By: Published:
पाक गुप्तहेराच्या प्रेमात पडत देशाशी गद्दारी; युट्यूबर ज्योती मल्होत्रा कोण ?

Who Is Jyoti Malhotra, Haryana YouTuber Arrested For Allegedly Spying For Pakistan : पाकिस्तान (pak) हा भारताविरुद्ध कुरापती करत असतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकला धडा शिकविला. पण घरातही घरभेदी असतात. ते आपली माहिती शत्रूला पुरवत असतात. आता पाकसाठी हेरगिरी केल्याचा आरोपाखाली हरियाणा (Haryana) येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा ​​(Jyoti Malhotra) हिच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. ज्योती मल्होत्रा पाकशी कशी संपर्कात आली ? पाकमध्ये ती कशी गेली, कोणाच्या प्रेमात पडून देशाशी गद्दारी केली ? तिच्यावर काय आरोप आहे हे या व्हिडिओतून पाहुया…

आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणात सहा जणांना अटक केली. यात ज्योती मल्होत्रा ​​हिचा समावेश आहे. याशिवाय मस्तगढ गावातील 25 वर्षीय देवेंद्र सिंगलाही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. देवेंद्रने भारताच्या लष्कराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवली होती. तो धार्मिक यात्रेच्या नावाखाली करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानात गेला होता, जिथे तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला आहे.

… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले


कोण आहे ज्योती मल्होत्रा ?

तीस वर्षीय ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ती दिल्लीत एका ठिकाणी नोकरी करत होती. परंतु कोरोना काळात तिची नोकरी गेली. त्यानंतर ​​तिने ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे यूट्यूब चॅनल  सुरू केले. तिचे सुमारे 3 लाख 77 हजार सबस्क्रायबर आहेत. तर Instagram वर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत तिच्या YouTube चॅनेलसाठी जवळजवळ 500 व्हिडिओ तयार केले आहेत. ज्यांचे 53 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हरियाणवी पंजाबी आणि पुराने ख्यालो की मॉडर्न लडकी अशी ती स्वतःचे वर्णन करते.

… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले

ज्योतीवर काय आरोप काय आहेत?
केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून ज्योतीबाबत संशयास्पद माहिती हरियाणा पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध Official Secrets Act, 1923 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 2023 मध्ये ज्योतीने कमिशनमार्फत पाकिस्तानचा व्हिसा मिळवला होता. त्यातून दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. तिची दानिशशी जवळची मैत्री झाली. या मैत्रीमुळे तिची दानिशने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्याशी ओळख करून दिली. ती पाकिस्तान हायकमिशनच्या कार्यालयात गेली. तेथे तिची अनेक पाक अधिकाऱ्यांशी भेट झाल्याचे समोर येत आहे. ज्योती या एजंट्ससोबत व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात राहायची. ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची, सोबतच तिने काही संवेदनशील माहितीसुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिली.


पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या प्रेमात विदेश दौराही केला

एवढंच नाही तर ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या प्रेमात पडली होती. तसेच त्याच्यासोबत नुकताच इंडोनेशियातील बाली येथे जाऊन आली होती, असे आता समोर आले आहे. ज्योती मल्होत्रा हिच्या सोशल मीडियावर असलेल्या प्रभावाचा वापर पाकिस्तान भारतविरोधी प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी करत होती, हेही आता समोर आले आहे. तसेच


ट्रव्हल व्लॉगद्वारे पाकिस्तान प्रेम दाखविले

ज्योती मल्होत्रा हिने तीन वर्षांत तीनवेळा पाक दौऱ्या केल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानमधील क्रिकेट सामने बघण्यासाठी ती गेली होती. याचा सर्व खर्च पाकमधील एका व्यक्तीने उचलला असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तान भेटीतील अनेक व्हिडिओ तिच्या ट्रॅव्हल व्लॉगवर आहे. त्यात तिने पाकबाबत सकारात्मक बाजू दाखविलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये तो अटारी-वाघा सीमा ओलांडताना, लाहोरच्या अनारकली बाजाराला भेट देताना, बसने प्रवास करताना आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेल्या कटास राज मंदिराला भेट देताना दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील एका फोटोवर उर्दूमध्ये इश्क लाहोर असे कॅप्शन आहे. त्यांनी पाकिस्तानी खाद्यपदार्थांबद्दल माहिती दिली आणि दोन्ही देशांमधील संस्कृतींची तुलना केली.


काश्मीरलाही भेटी

ज्योतीने गेल्या वर्षी काश्मीरलाही भेट दिली होती. ज्यामध्ये ती दाल सरोवरावर शिकारा राईडचा आनंद घेत असल्याचे दिसून आली. त्याने श्रीनगर ते बनिहाल या रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर तिने काश्मीरबाबत विचार व्यक्त करताना आपण पुन्हा काश्मीरला जावे का ? असे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube