Download App

महुआ मोईत्रांना टफ फाईट देणार ‘राजमाता’? भाजपच्या उमेदवार आहेत तरी कोण?

Image Credit: letsupp

Krushna Nagar Loksabha : देशात लोकसभा निवडणुकांचं (Krushna Nagar Loksabha) बिगुल वाजलंयं. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच भाजपकडून (BJP) काल उमेदवारांची 5 वी यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये भाजपने 111 उमेदवार जाहीर केले असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्याविरोधात भाजपने ट्रम्प कार्ड खेळल्याचं दिसून येत आहे. भाजपने मोईत्रा यांच्याविरोधात कृष्णनगर मतदारसंघातून राजमाता अमृता रॉय (Rajmata Amruta Roy) यांना उमेदवारी जाहीर केलीयं. त्यामुळे सध्या अमृता रॉय नेमक्या आहेत तरी कोण? याचीच सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

आधी लोकसभेचा प्रचार करा : फडणवीसांनी पाटलांना दटावले; ‘शब्दाविनाच’ करावे लागणार अजितदादांचे काम

अमृता रॉय यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी रॉय याच भाजपकडून कृष्णनगर मतदारसंघात उमेदवार असतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता थेट पाचव्या यादीत अमृता रॉय यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. कृष्णनगरमधील राजबारीच्या राजमाता म्हणून त्यांची ओळख आहे.

18 व्या शतकातील महाराजा क्रिष्णा चंद्रा रॉय यांच्याशी अमृता रॉय यांचा संपर्क असल्याचं सांगितलं जात आहे. इतिहासातच क्रिष्णा रॉय हे प्रभावी व्यक्तिमत्व राहिलं आहे. त्यांनी आपल्या शासनात अनेक सुधारणांसह बंगाली संस्कृतीला चांगली चालना दिली असल्याचा इतिहास आहे.

नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, विखेंसाठी शिंदे आणि अजितदादांकडून मोर्चेबांधणी

कृष्णनगर हे नादिया राजांचं निवासस्थान आहे. नादिया जिल्हा हा पश्चिम बंगालमधील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. याच जिल्ह्यात रॉयल पॅलेस अस्तित्वात आहे. या पॅलेसमध्ये 18 व्या शतकातील अनेक दुर्मिळ वस्तू आजही अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, महुआ मोईत्रा मागील अनेक दिवसांपासून चांगल्याच चर्चेत होत्या. संसदेत मोदी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांपैकी त्या एक मानल्या जातात. मोदी सरकारला संसदेत दणाणून सोडणाऱ्या महुआ यांच्याविरोधात आता भाजपने राजमाता अमृता रॉय यांना मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे आता मोईत्रा आणि राजमाता यांच्यात टफ फाईट होणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज