Mobile Phone Seized from Lashkar-e-Taiba Militant : बंगलुरु सेंट्रल हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे तुरुंगात असलेल्या लष्कर -ए- तोयबाच्या एका अतिरेक्याकडे मोबाईल असल्याचा खुलासा झाल्याने (Mobile) राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) कामाला लागली होती. त्यानंतरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अतिरेक्यासह अन्य कैद्यांना या तुरुंगातील एक मानसउपचार तज्ज्ञचे तिप्पट भावाने मोबाईल विकत असल्याचं उघडकीस आलंय.
एनआयएने केलेल्या तपासात मानसोपचार तज्ज्ञ एका मोबाईलच्या दुकानातून ८ ते ९ हजाराचे मोबाईल विकत घ्यायचा आणि या कैद्यांना २५ हजार रुपयांना विकायचा असे उघडकीस आलं आहे. दुप्पट कमाईमुळे त्याला चांगला फायदा होत असल्याने त्याने हा साईड बिझनस चालू केला होता. या मानसोपचार तज्ज्ञांची तपासणी केली जात नव्हती त्यामुळे त्याचा हा धंदा बिनबोभाट सुरु होता. त्याचे नाव डॉ. एस. नागराज असून एनआयए त्याची चौकशी सुरु केली आहे.
एनआयए तुरुंगाच कट्टरपंथाची लागण झाल्याचा तपास करत आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ४७ वर्षीय दोषी थडीयंताविद नसीर याच्यावर तुरुंगातील तरुणांना कट्टरतेचे धडे देत असल्याचा एनआयएचा आरोप आहे. दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एस. नागराज याचा हा कारनामा उघडकीस आला आहे. हा डॉक्टरचे राहणीमान आलिशान होते. त्याच्या दोन प्रेयसी होत्या. त्या देखील मोबाईल खरेदी आणि त्याचे वितरण कैद्यांना करण्यात मदत करायच्या असे उघडकीस आलं आहे.
हनीट्रॅप प्रकरणात ट्विस्ट! करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट, पीडितेलाच आणले समोर; आरोपांनी उडाली खळबळ
तुरुंगाच्या हाय सिक्युरिटी बॅरकमध्ये बंद असलेल्या टी.नसीर सारख्या दोषी कैद्यांकडे मोबाईल फोन खरेदीसाठी पैसा आला त्याच्या स्रोताची चौकशी एनआयए करीत आहे. डॉक्टरने अन्य कैद्याच्या तुलनेत त्याला आणखीन जादा पैसे आकारात मोबाईल विकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नसीरकडे इतके पैसे तुरुंगात असताना आले कसे याचा तपास एनआयए करत आहे. तसंच, हे फोन रघु याच्या नावाने खरेदी केले गेल्याचे कोर्टात एनआयएने सांगितले. आरोपी नंबर १ टी.नसीर हा वापरत असलेला मोबाईलही रघु याच्या नावाने प्रिया मोबाईल दुकानातून खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
जेलमध्ये मोबाईल तस्करीसाठी मानसोपचार तज्ज्ञाने कॅश स्वरुपात पैसे स्वीकारल्याचं उघड झालं आहे. आता कोर्टाने जेल अधिकाऱ्यांना हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी एनआयएला मदत करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात डॉ. एस नागराज याचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याला ८ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. टी. नसीर याला केरळ येथील दहशतवादी कृत्या प्रकरणात अटक झाली होती. सध्या त्याच्यावर २००८ च्या बंगलुरु सिरियल ब्लास्ट आणि जेलमध्ये कट्टरवाद पसरवल्याच्या प्रकरणात केस सुरु आहे. या प्रकरणात अन्य कैद्यांची चौकशी केली जात आहे.