बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही? सावली डान्सबार प्रकरण, रोहिणी खडसेंचा चाकणकरांना टोला

Rohini Khadse On Rupali Chakankar : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील सावली डान्सबारचा (Savli Dance Bar) परमिट योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम (Jyoti Kadam) यांच्या नावे असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तर आता या प्रकरणावरुन विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) हल्लाबोल केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सावली डान्सबार प्रकरणात बोलणे टाळल्याने रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी एक्स वर पोस्ट करत रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे. बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही? सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगणार का? असा सवाल रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना विचारला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ? राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार 2024-2025 या कालावधीत 18 वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096 आहे आणि 18 वर्षांवरील महिलांची संख्या 33599 इतकी आहे. तुमचं महिला आयोग यावर काय पावलं उचलत आहे ? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का ? की सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल ? असं रोहिणी खडसे एक्स वर म्हणाल्या आहे.
बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ?
राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ?
मागच्या आठवड्यात एका… pic.twitter.com/zZ68kyOvtS
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 19, 2025
नेमकं प्रकरण काय?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. या डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकली होती आणि 22 बारबाल, 22 ग्राहकांना आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. असं म्हणत राज्यात डान्सबार वर बंदी असताना हा बार कसा सुरु आहे? असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना उपस्थित केला होता.
Video : जनसुरक्षा विधेयक अन् विरोधकांचा गेम; फडणवीसांची कुटनिती सांगत दादांनी सगळे पत्ते उघडले