Video : जनसुरक्षा विधेयक अन् विरोधकांचा गेम; फडणवीसांची कुटनिती सांगत दादांनी सगळे पत्ते उघडले  

Video : जनसुरक्षा विधेयक अन् विरोधकांचा गेम; फडणवीसांची कुटनिती सांगत दादांनी सगळे पत्ते उघडले  

Ajit Pawar On Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक (Public Safety Bill) मंजूर केले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधक या विधेयकाचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे विधानसभेत जनसुरक्षा विधेयकाच्या चर्चेच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा हसहसत भाषण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध का केला नाही? असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे.

तर दुसरीकडे जनसुरक्षा विधेयकाच्या चर्चेच्या वेळी महायुती सरकारची (Mahayuti Government) काय योजना होती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांचा गेम कसा केला याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हणाले की, जनसुरक्षा विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अध्यक्ष होते. या समितीमध्ये 25 सदस्य होते. या समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांमधील सर्व मोठ्या नेत्यांना संधी दिली होती. मात्र विरोधकांना हे माहिती नव्हते की, चर्चा करताना त्यांना चर्चेत सहभागी होता येणार नाही. चर्चेत या विधेयकाला विरोध करा अशी सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या मात्र जेव्हा  त्यांना कळलं की आपण चर्चेत सहभागी होऊ शकत नाही तेव्हा त्यांचे चेहरे इतके केविलवाणे झाले होते. असं अजित पवार म्हणाले. विधेयक मंजूर झाल्यानंतर वरिष्ठांकडून विचारणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. असं देखील अजित पवार म्हणाले. जनसुरक्षा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा गेम केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड, मवाली पोसले; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल 

तर दुसरीकडे विधिमंडळात मंजूर झालेल्या जनसुरक्षा कायद्याबद्दल अपप्रचार करण्यात येत असून सरकारविरोधी भूमिका मांडल्यास किंवा आंदोलन केल्यास या कायद्याचा उपयोग करुन कोणालाही अटक करण्यात येणार नाही. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube