CJI Suryakant यांना ‘त्या’ प्रकरणात तब्बल 71 जणांचे खुले पत्र; वकील, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नाराजी

CJI Suryakant :  भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. एका सुनावणी दरम्यान त्यांनी बेरोजगार

CJI Suryakant

CJI Suryakant

CJI Suryakant :  भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. एका सुनावणी दरम्यान त्यांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांळी केल्याने याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची (Cockroach Janata Party) स्थापना करण्यात आली आहे. या पार्टीला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. तर आता दुसरीकडे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या आणखी एका विधानावरुन आता नवा वाद सुरु होताना पाहायला मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांना खुले पत्र पाठवले आहे.

या पत्रात निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिरणाच्या एका आदेशाविरुद्धच्या अपिलाच्या सुनावणीदरम्यान पर्यावरण याचिकाकर्त्यांबद्दल सरन्यायाधीश सूर्यकांत (CJI Suryakant) यांनी केलेल्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे. तब्बल 71 जणांच्या स्वाक्षऱ्या असलेले हे खुले पत्र घटनात्मक आचारण गटाकडून जारी करण्यात आले आहे.

 नेमकं काय म्हणाले सरन्यायाधीश सूर्यकांत?

राष्ट्रीय हरित न्यायाधिरणाच्या एका आदेशाविरुद्धच्या अपिलाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले होते की, आम्हाला भारतातील असा एकही प्रकल्प दाखवा जिथे पर्यावरण कार्यकर्ते  म्हणतात की, आम्ही या प्रकल्पाचे स्वागत करतो. देशाची प्रगती होत आहे असं सरन्यायाधीस सूर्यकांत म्हणाले होते मात्र त्यांची ही टिप्पणी लेखी आदेशाचा भाग नव्हती.

तर सर न्यायाधीश सूर्यकांत यांच्या या टिप्पणीनंतर या पत्रात निवृत्त अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अशा विधानांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि विरोधी आवाज दाबला जाऊ शकतो, ज्यामुळे ते पर्यावरणाची हानी आणि समुदाय व सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल परिणामांबद्दल प्रश्न विचारण्यास परावृत्त होतील.

श्रेयस अय्यरला पुन्हा धक्का; सूर्यकुमारनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार-

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यांमधून पक्षपात आणि पूर्वग्रह दिसून येतो आणि देशाच्या सर्वाच्च न्यायिक संस्थेकडून असे वक्तव्य येणे चिंताजनक आहे असं या पत्रात निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version