पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. सोमवारपासून (२४ एप्रिल) पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय केरळ दौरा सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यात प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.
केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन करतील. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल
केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी माहिती दिली आहे की कोचीच्या एका व्यक्तीच्या नावाने मल्याळम भाषेत हे पत्र लिहिले होते. जे केरळमधील भाजप कार्यालयाला आठवड्यापूर्वी पाठवण्यात आले होते. भाजपकडून हे धमकीचे पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पत्रावर कोचीचे रहिवासी एनके जॉनी यांचा पत्ता लिहिला आहे. अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्यांनी असे पत्र लिहिल्याचा इन्कार करत हे पत्र कोणीतरी आपले नाव वापरून लिहिले असावे, असे सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल
पोलिसांनी एनके जॉनीच्या घराचा तपास करून त्याची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी त्याच्या हस्ताक्षराची तुलना पत्रातील अक्षराशी केली. त्यानंतर ते पत्र त्यांनी लिहले नसल्याचं ठरवण्यात आले. जॉनी यांनी सांगितलं की त्याच्याशी शत्रुत्व असलेल्या कोणीतरी पत्रात त्याचे नाव लिहिले असावे. जॉनी यांनी काही संशयित लोकांची नावेही पोलिसांना सांगितली आहेत, ज्यांच्यावर त्याला संशय आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.