Download App

चौथ्या टप्प्यात घमासान! पाच मंत्री, एक माजी CM, दोन क्रिकेटर अन् अभिनेते मैदानात

पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Lok Sabha Elections 2024 : देशात पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या (Lok Sabha Elections 2024) टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानाची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या चौथ्या टप्प्यात 10 राज्यांतील 96 मतदारसंघातील 1 हजार 717 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. याच टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व 25 मतदारसंघात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात पाच केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री, दोन क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात आहे.

मंत्री नित्यानंद राय तिसऱ्यांदा मैदानात

बिहारमधील उजियारपुर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाने आलोक कुमार मेहता यांना तिकीट दिले आहे. तर बसपाने मोहन कुमार मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त पाच अपक्षांसह एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत.

बेगुसरायची देशात चर्चा, मंत्री रिंगणात

बिहारमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदरसंघांपैकी बेगुसराय हा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात केंद्रीय ग्रामीण आणि पंचायत राज विकास मंत्री गिरिराज सिंह निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात बसपाने चंदन कुमार दास आणि कम्युनिस्ट पक्षाने अवधेश कुमार राय यांना मैदानात उतरवले आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपात ही जागा सीपीआय पक्षाच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघात तीन अपक्षांसह एकूण 10 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

उत्तर प्रदेशातील खीरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीने उत्कर्ष वर्मा आणि बसपाने अंशय कालरा यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात दोन अपक्षांसह 11 उमेदवार रिंगणात आहेत. झारखंड मधील खुंटी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने काली चरण मुंडा यांना तर बसपाने सावित्री देवी यांना तिकीट दिले आहे. दोन अपक्षांसह सात उमेदवार रिंगणात आहेत.

सिकंदराबादमध्ये अपक्षांची गर्दी

हैदराबाद जवळील सिकंदराबाद मतदारसंघात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी दुसऱ्यांदा निवडणुकीत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दानम नागेंद्र, बसपाचे बस्वानंदम दांडेपू आणि भारत राष्ट्र समितीचे टी. पद्मराव यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात तब्बल 27 अपक्षांसह 45 उमेदवार रिंगणात आहेत.

सिंहभूम मध्ये पती-पत्नी निवडणुकीत

झारखंड राज्यातील सिंहभूम मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मधू कोडा रिंगणात आहेत. भाजपने त्यांच्या पत्नी गीता कोडा यांना तिकीट दिले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने जोबा माझी यांना तर बसपाने परदेशी लाल मुंडा यांना उमेदवारी दिली आहे. पाच अपक्षांसह 15 उमेदवार रिंगणात आहेत.

सॅम पित्रोदा यांचे विधान म्हणजे निव्वळ बकवास; रॉबर्ट वाड्रा यांनी सुनावलं

हैदराबादमध्ये हायहोल्टेज लढत

हैदराबाद मतदारसंघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने के एस कृष्णा यांना तर भारत राष्ट्र समितीने श्रीनिवास यादव यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात सात अपक्षांसह 30 उमेदवार रिंगणात आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडेंना सोनवणेंचं आव्हान

महाराष्ट्रातील बीड मतदारसंघातील लढत देशभरात चर्चेत आहे. येथे महायुतीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे तर वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात बसपाचाही उमेदवार आहे. या मतदारसंघात 29 अपक्षांसह 41 उमेदवार रिंगणात आहेत.

माजी CM अखिलेश यादव १२ वर्षांनंतर रिंगणात

कन्नोज मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव बारा वर्षानंतर पुन्हा निवडणुकीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांना तिकीट दिले आहे. बसपाने इम्रान बिन जफर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सात अपक्षांसाह 15 उमेदवार रिंगणात आहेत.

“मी शब्द पाळला, ७२ तासांच्या सरकारमध्ये गेलो”; पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांनी काय सांगतिलं?

पश्चिम बंगालमधील बहरामपुर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी निवडणूक लढवत आहेत. तृणमूल काँग्रेसने येथे क्रिकेटर युसुफ पठाणला तिकीट दिले आहे. भाजपने निर्मल कुमार साहा यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने संतोष विश्वास यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या मतदारसंघात सहा अपक्षांसह 15 उमेदवार रिंगणात आहेत.

कॅश फॉर क्वेरी प्रकरणातील महुआ मोईत्रांनी TMC चं तिकीट

कृष्णा नगर मतदारसंघातील निवडणूक देशभरात चर्चेत आहे. संसदेतील कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या टीएमसी नेत्या महूआ मोईत्रा यांना तिकीट दिले आहे. भाजपने राजा कृष्णचंद्र राय परिवारातील अमृता राय यांना तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (मार्क्सवादी) एसएम सादी यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात पाच अपक्षांसह 11 उमेदवार रिंगणात आहेत.

बर्धमानमध्ये माजी क्रिकेटपटू मैदानात

बर्धमान लोकसभा मतदारसंघातून माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते दिलीप घोष यांना तिकीट दिले आहे. बसपाने प्रभुनाथ साह यांना तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (मार्क्सवादी) सुकृती घोषाल यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात दोन अपक्षांसह आठ उमेदवार रिंगणात आहेत.

आसनसोनलमध्ये पुन्हा शत्रुघ्न सिन्हांना तिकीट

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघात टीएमसीने विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे. भाजपने एस एस अहलुवालिया यांना तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने जहाआरा खान यांना उमेदवारी दिली आहे. बसपानेही सन्नी कुमार साह यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात दोन अपक्षांसह सात उमेदवार रिंगणात आहेत.

follow us