सॅम पित्रोदा यांचे विधान म्हणजे निव्वळ बकवास; रॉबर्ट वाड्रा यांनी सुनावलं

सॅम पित्रोदा यांचे विधान म्हणजे निव्वळ बकवास; रॉबर्ट वाड्रा यांनी सुनावलं

Robert Vadra on Sam Pitroda :  दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे लोकांसारखे दिसतात, असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा (Sam Pitroda ) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्र (Robert Vadra) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, असल्याचं ते म्हणाले.

व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी … 

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, तुम्ही गांधी कुटुंबाशी संबंधित आहात. तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे. जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर असता, तेव्हा तुमच्याकडे जबाबदारीही मोठी असते. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करणे महत्त्वाचे आहे. सॅम पित्रोदा यांच्या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहे. त्यांनी केलेलं विधान केवळ बकवास आहे. एखादी सुशिक्षित व्यक्ती असं विधान कसं करू शकतो? याचे मला आश्चर्य वाटते, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र 

भाजपचा पराभव करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपला त्यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. पित्रोदा यांनी भारतात येऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलावे. मात्र, ते सोफ्यावर बसून नको त्या गोष्टी बोलत आहेत. काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे ऐकून मला आनंद झाला आहे, असंही वाड्रा म्हणाले.

सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले?
सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते भारतातील अनेक भागात राहणाऱ्या नागरिकांच्या रंगावरून वांशिक टिप्पणी केली आहे. त्यांनी पूर्वेकडील भारतीयांची तुलना चिनी लोकांशी आणि दक्षिण भारतीयांची तुलना आफ्रिकन लोकांशी केली. यावरून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने हे पित्रोदा यांचं वैयक्तिक मत असून याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं. भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांनी केलेली तुलना दुर्दैवी आणि स्वीकारार्ह नाही. भारतीय काँग्रेस याला समर्थन देत नाही, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींची टीका
तेलंगणातील वारंगलमध्ये सभा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सॅम पित्रोदा यांचा समाचार घेतला. त्यांच्या तत्त्वज्ञानाने कातडीच्या आधारे देशवासीयांचा अपमान केला. शिवीगाळ केली. आज मला खूप राग आला आहे. लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण असं विधान मला सहन होणार नाही.संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक माझ्या देशाचा अपमान करत असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज