Download App

Lok Sabha Election : ‘यूपी’त आघाडी टिकणार; काँग्रेसच्या फॉर्म्यूल्याने जागावाटपाचा तिढा सुटला

Lok Sabha Election : जागावाटपावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता आता मावळली आहे. दोन्ही पक्षांत एक (Lok Sabha Election) फॉर्म्यूला तयार झाला आहे. काही वेळातच जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी काँग्रेसला 17 जागा देऊ शकते. काँग्रेसकडून मात्र 20 पेक्षा जास्त जागा मागितल्या जात होत्या. परंतु, काँग्रेसचा विरोध आता मावळल्याचे दिसत आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले, आमच्यात कोणताही वाद नाही. लवकरच आघाडी होईल आणि चित्र स्पष्ट होईल. बाकीच्या गोष्टी जु्न्या झाल्या आहेत. भाजपात गेलेले नेतेही लवकरच परततील.

‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का! जागावाटपाच्या चर्चा फेल; ‘समाजवादी पार्टी’चा स्वबळाचा नारा?

काँग्रेसला रायबरेली, अमेठी आणि कानपूर मतदारसंघ मिळू शकतो. तसेच फतेहपूर सिक्री, बांसगाव आणि सहारनपूर या जागाही काँग्रेसच्या खात्यात जातील. समाजवादी पार्टी प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाजियाबाद, देवरिया, बाराबंकी, मथुरा आणि सीतापूर मतदारसंघ मिळू शकतो. आघाडीबाबत दोन्ही पक्षांचे नेते आज संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने दोन जागांवर तडजोड करण्याचे मान्य केले आहे. मुरादाबाद मतदारसंघाचा दावा काँग्रेसने सोडला आहे. समाजवादी पार्टीने ज्या जागांचा प्रस्ताव दिला आहे तो काँग्रेसने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. सीतापूर मतदारसंघ काँग्रेसला दिला आहे तर हाथरस मतदारसंघ सपाने पुन्हा मिळवला आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की आघाडी टिकवण्यात प्रियंका गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रियंका गांधी यांनी चर्चा सुरू केली. काँग्रेसने मुरादाबाद मतदारसंघावरील दावा सोडला त्याऐवजी श्रावस्ती, सीतापूर आणि वाराणसी या मतदारसंघांची मागणी केली. यानंतरच दोन्ही पक्षांत पुढील चर्चा होऊ शकली. काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर प्रियंका गांधींनी फोनद्वारे अखिलेश यादव यांच्याबरोबर संवाद साधला. त्यानंतर दोन्ही पक्षांत आघाडी करण्याबाबत एकमत झाले.

दोन्ही पक्षांच्या जागावाटपात तीन मतदारसंघांवरून तिढा निर्माण झाला होता. वाद इतका वाढला होता की आघाडी तुटण्याच्या बेतात आली होती. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. काँग्रेसकडून मुरादाबाद, बिजनौर आणि बलिया या जागांची मागणी केली जात होती. समाजवादी पार्टी मात्र या जागा सोडण्यास तयार नव्हती. समाजवादी पार्टीने यापुढे जाऊन आपले उमेदवारही जाहीर केले होते. त्यामुळे तणाव वाढला होता.

उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

जागावाटपावर अखिलेश यादव यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी काँग्रेस नेत्यांना आघाडीची शक्यता वाटत होती. काँग्रेस नेत जयराम रमेश म्हणाले होते, की चर्चा अंतिम टप्प्यात आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सकारात्मक वातावरण आहे. इंडिया आघाडीबरोबर निवडणुकीला सामोरे जावे अशी समाजवादी पार्टीचीही इच्छा आहे. आघाडी मजबूत व्हावी अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. परंतु, यासाठी थोडा वेळ लागेल.

follow us