Download App

Lok Sabha Elections 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची सहावी यादी जाहीर! कुठं, कोणाला संधी?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024)जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती (Mahayuti)आणि इंडिया आघाडीनं (India Alliance)काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर काही जागांवर अद्यापही जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आता होळी आणि धुलिवंदनचा (Dhulivandan)सण देशभरात साजरा केला जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजस्थानसाठी चार आणि तामिळनाडूसाठी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार; धैर्यशील मानेंचा दावा

कॉंग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) जारी केलेल्या निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तामिळनाडू विधानसभा जागा क्रमांक 233 विलावनकोड येथील पोटनिवडणुकीत डॉ. थरहाई कुथबर्ट यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.

काँग्रेसने रविवारी (24 मार्च 2024) तीन उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीतील तिन्ही नावे राजस्थानमधील (चंद्रपूर, जयपूर आणि दौसा) होती.

काँग्रेसने आपले घोषित उमेदवार सुनील शर्मा यांना हटवून माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांना जयपूरमधून उमेदवारी दिली आहे. नवोदित सुनील शर्माच्या वादानंतर हा निर्णय घेतला आहे.

त्याआधी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. यामध्ये 45 उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसने राजस्थानमधील नागौर जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासाठी सोडली होती. त्यापूर्वी 21 मार्चला काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती, त्यात
57 नावांचा समावेश होता. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची घोषणा केली आहे.

follow us

वेब स्टोरीज