पवारांशी चर्चा करणाऱ्या जानकरांचा यू-टर्न; शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची मोठी खेळी

  • Written By: Published:
पवारांशी चर्चा करणाऱ्या जानकरांचा यू-टर्न; शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची मोठी खेळी

Loksabha Election: Mahadev Jankar With mahayuti : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे माढा लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) लढण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. खुद्द शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. महादेव जानकर व शरद पवार यांची भेटही झाली होती. परंतु आता महादेव जानकर यांनी मोठी पलटी मारली आहे. ते आता महाविकास आघाडीत (MahaVikas Agadi) जाणार नाहीत. ते आता महायुतीचे घटकपक्ष राहणार आहेत. त्यांच्या पक्षाला एक जागाही मिळणार आहे. महायुती परभणीची जागा महादेव जानकरांसाठी सोडणार असल्याचे बोलले जात आहे.

‘गरळ ओकून CM शिंदेंनीही लाट अंगावर घेतली’; ‘करेक्ट कार्यक्रम’ वरुन मनोज जरांगेंनी वचपा काढलाच

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar भाजपसोबत म्हणजे महादेवाच्या पिंडीवर विंचू, चप्पल मारायचीही अडचण; शिवतारेंचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

संजय जाधवांविरोधात मैदानात
परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव हे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात महादेव जानकर हे रिंगणा उतरणार आहेत. या जागेवरून महादेव जानकर हे इच्छुक होते. त्यमुळे या मतदारसंघात संजय जाधवविरुद्ध महादेव जानकर अशी लढत होईल.


बारामती व माढा मतदारसंघ ‘सेफ’करण्याचा डाव

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार यांची टफ फाईट होणार आहे. सुप्रिया सुळे यांना हा मतदारसंघ सोपा जावा, यासाठी जानकरांना माढा मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रयत्न शरद पवारांचा होता. परंतु अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी ही गेम उलटवली आहे. तसेच माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना मोहिते घराणे, रामराजे निंबाळकरांना विरोध दर्शविला आहे. पण महादेव जानकरांना पक्षात माढाची जागाही सेफ करण्याचा डाव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube